Baramati News: बारामतीत सावकारीच्या त्रासाला कंटाळून युवकाची आत्महत्या; पाच जणांविरोधात गुन्हा

व्याजाची रक्कम परत करूनही सुरूच होती पैशांची मागणी; आत्महत्येपूर्वी लिहून ठेवली चिठ्ठी
Assault
AssaultPudhari
Published on
Updated on

बारामती: व्याजाने घेतलेली रक्कम दिल्यानंतरही आणखी पैशाची मागणी होवू लागल्याने त्रासलेल्या युवकाने पारवडी (ता. बारामती) येथे शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. धनेश गुंडीबा गोसावी (वय ४०) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती. या प्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी पाचजणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्यासह सावकारी अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला.

Assault
Pune Weather Update: प्री-मान्सूनच्या पावसाने पुणेकरांना दिलासा; अडीच महिन्यांनंतर तापमान 34 अंशांवर

या प्रकरणी रुपाली धनेश गोसावी (रा. गोसावीवस्ती, पारवडी, ता. बारामती) यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी सोनू उर्फ लखन यादव डावरे, जयश्री लखन यादव डावरे (रा. साठेनगर, इंदापूर), सतीश शहाजी लांडगे, मारुती हरीदास लांडगे व प्रितम उर्फ कावा लांडगे (रा. पारवडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. रविवारी (दि. २४) दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली.

Assault
Pune Local Body Election: पुणे जागेवरून महायुतीत रस्सीखेच; राष्ट्रवादीचा भाजपवर हक्काचा दावा

फिर्यादीचे पती धनेश यांनी त्यांचे मित्र सतीष मारुती व प्रितम लांडगे यांच्या अोळखीने इंदापूर येथील खासगी सावकार सोनू उर्फ लखन यादव डावरे याच्याकडून ३० डिसेंबर २०२४ रोजी इंदापूर येथे नोटरी करत तीन महिने मुदतीवर १ लाख रुपये हात उसने घेतले होते. प्रत्यक्षात ही रक्कम व्याजाने दिली होती. दि. २२ एप्रिल २०२५ रोजी धनेश व पुतण्या गौरव यांनी इंदापूरला जात १ लाख ७० हजार रुपये रोख स्वरुपात व्याजासह परत केले. त्यानंतरही या पाचजणांनी फिर्यादीच्या घरी येत राहिलेले व्याजाचे पैसे द्या, तुम्ही पैसे द्यायला उशीर केला आहे, त्याचा दंड म्हणून आणखी पैसे द्यावे लागतील अशी मागणी केली.

Assault
Pune Land Scam: वेल्हे-राजगड परिसरात जमीन दलालांचा विळखा; शेतकऱ्यांची मोठी फसवणूक

दि. २६ जून २०२५ रोजी त्यांना २ लाख रुपये रोख स्वरुपात दिले होते. तरीही धमकावणे सुरुच होते. त्यानंतर ३० नोव्हेंबर ०२५ रोजी १ लाख रुपये रोख स्वरुपात देण्यात आले. त्यानंतर आणखी दीड लाखाची मागणी करण्यात आली. १२ मे २०२६ रोजी या पाचजणांनी फिर्यादीच्या घरी येत राहिलेल्या दीड लाख रुपयांसाठी पुढील तारखेचा वायदा करत फिर्य़ादीच्या कानातील ५ ग्रॅमचे सोन्याचे टाॅप्स नेले होते. रक्कम दिल्यावर हे टाॅप्स माघारी करू असे सांगितले होते. जाताना त्यांनी धनेश यांना एक तर पैसे दे, नाही तर तुझ्याकडे आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही अशी धमकी दिली होती. दहशतीपोटी या प्रकरणी कोणतीही तक्रार केली गेली नव्हती.

Assault
Pune Metro Water Leakage Video: पुणे मेट्रो डब्यात पाणीगळतीचा व्हिडीओ व्हायरल

दि. २४ मे २०२६ रोजी धनेश हे शेतात गेले. दुपारी साडे बाराला घरी आले. पाणी पिवून पुन्हा शेतात गेले. फिर्यादीने जेवणासाठी फोन केला असता माझे पोट दुखत आहे, मी जेवण करणार नाही असे सांगत त्यांनी फोन कट केला. दुपारी पुतण्या गौरव याने मोटारसायकल पाहिजे म्हणून धनेश यांना फोन केला. परंतु फोन बंद लागत होता. त्यामुळे तो शेतात गेला. तेव्हा तेथे धनेश हे लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. गौरव याने पळत घरी येत ही माहिती दिली. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांना कळविण्यात आले. मृतदेह खाली घेत तो उत्तरीय तपासणीसाठी रुई ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. धनेश यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली असून पोलिसांनी ती चिठ्ठी ताब्यात घेतली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news