Pune MNGL PNG Connections: पुणेकरांना मिळणार वेगवान गॅस कनेक्शन; एमएनजीएल दररोज देणार ८०० पीएनजी जोडण्या

सीएनजी स्टेशनचे जाळे मजबूत; पुणे-पीसीएमसीत ४.५५ लाख घरांमध्ये पीएनजी वापर, पायाभूत सुविधा विस्ताराला वेग
Gas Pipeline
Gas PipelinePudhari
Published on
Updated on

पुणे: भविष्यातील वाढती मागणी लक्षात घेऊन एमएनजीएल कंत्राटदारांची संख्या वाढविणे, अतिरिक्त तांत्रिक पथके नियुक्त करणे आणि कुशल मनुष्यबळ वाढविणे, यांसारख्या उपाययोजनांद्वारे महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड अर्थात एमएनजीएल पायाभूत सुविधा बळकट करीत आहेत. यातून एमएनजीएल भविष्यात दररोज ८०० कनेक्शन देणार असल्याची माहिती एमएनजीएलच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Gas Pipeline
Hepatitis In Maharashtra: हेपेटायटिसचा छुपा धोका; महाराष्ट्रात दीड टक्क्यांपर्यंत नागरिक संसर्गाच्या विळख्यात

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएनजीएलने पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका परिसरात १३१ सीएनजी स्टेशनचे मजबूत जाळे उभारले असून, या माध्यमातून सहा लाखांवर सीएनजी वाहनांना सेवा पुरवली जात आहे. सध्या दररोज १४ लाख स्टँडर्ड क्युबिक मीटरपेक्षा अधिक सीएनजीचा वापर वरील भागात होत आहे.

Gas Pipeline
Pune Railway Station Water Bottle Sale: पुणे रेल्वेस्थानकावर ‘रेल नीर’ला बगल? इतर ब्रँडच्या पाण्याच्या बाटल्यांची सर्रास विक्री

पावसाळ्यात प्रवासी दुचाकीऐवजी चारचाकी वाहनांना प्राधान्य देत असल्यामुळे सीएनजीची मागणी तात्पुरती वाढते. वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी एमएनजीएलने गेल्या वर्षभरात पुणे आणि पीसीएमसी परिसरात ११ नवीन सीएनजी स्थानके सुरू केली असून, त्यामुळे सीएनजी कॉम्प्रेशन आणि वितरणक्षमता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एमएनजीएल दररोज १ हजार २०० हून अधिक पीएमपीएमएलच्या सीएनजी बसना इंधन पुरवत असून, पुण्याच्या सार्वजनिक वाहतूकव्यवस्थेला महत्त्वपूर्ण आधार देत आहे.

Gas Pipeline
Pune Stray Dog Attack: वाघोली-लोहगावात भटक्या कुत्र्यांची दहशत; चिमुरडीसह ६ नागरिकांवर हल्ले

सीएनजीव्यतिरिक्त एमएनजीएल सध्या पुणे आणि पीसीएमसी परिसरातील ८.५० लाखांहून अधिक घरांमध्ये तसेच एक हजारपेक्षा अधिक औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांसाठी पाइप्ड नॅचरल गॅस पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत आहे. यासाठी कंपनीने २ हजार ७०० किमीहून अधिक लांबीचे मजबूत पाइपलाइन नेटवर्क उभारले आहे. सध्या ४ लाख ५५ हजारांहून अधिक घरांमध्ये पीएनजीचा प्रत्यक्ष वापर सुरू आहे. या यशाच्या आधारावर घरगुती क्षेत्रात पीएनजीचा अधिक व्यापक विस्तार करण्यासाठी एमएनजीएलने वेगवान पायाभूत सुविधा विस्तार कार्यक्रम हाती घेतला आहे.

Gas Pipeline
Pune Water Supply Shutdown: पुणेकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी शहरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा राहणार बंद

महिन्याला १५ हजार जोडण्या

मागणीत झालेल्या अलिकडील वाढीपूर्वी एमएनजीएल दररोज सुमारे १८० ते १९० घरांना पीएनजी जोडणी देत होती, म्हणजेच, दरमहा सुमारे ६ हजार जोडण्या दिल्या जात होत्या. आज कंपनी दररोज सुमारे ५०० नवीन पीएनजी जोडण्या, म्हणजेच दरमहा जवळपास १५ हजार जोडण्या देत असून, ही क्षमता सुमारे २५० टक्क्यांनी वाढली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news