Pune Railway Station Water Bottle Sale: पुणे रेल्वेस्थानकावर ‘रेल नीर’ला बगल? इतर ब्रँडच्या पाण्याच्या बाटल्यांची सर्रास विक्री

तुटवड्यामुळे १० ब्रँड्सना तात्पुरती परवानगी; मात्र अनधिकृत पाणी विक्री आढळल्यास विक्रेत्यांवर कारवाईचा रेल्वेचा इशारा
Pune Railway Station Water Bottle Sale
Pune Railway Station Water Bottle SalePudhari
Published on
Updated on

पुणे: रेल्वेस्थानकावर आणि रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांना अधिकृत ‌'रेल नीर‌' पाण्याच्या बाटल्यांची विक्री करणे बंधनकारक असतानाही, पुणे रेल्वेस्थानक आणि रेल्वेगाडीमध्ये इतर ब्रँड्सच्या पाण्याच्या बाटल्यांची सर्रास विक्री होत असल्याचे उघडकीस आले आहे. दै.‌'पुढारी‌'च्या प्रतिनिधीने रविवारी (दि.26) पुणे रेल्वेस्थानकावर केलेल्या ‌'ऑन द स्पॉट‌' पाहणीत हा प्रकार समोर आला.

Pune Railway Station Water Bottle Sale
Pune Stray Dog Attack: वाघोली-लोहगावात भटक्या कुत्र्यांची दहशत; चिमुरडीसह ६ नागरिकांवर हल्ले

विशेष म्हणजे, हे विविध अनोळखी किंवा वेगळ्या ब्रँड्सच्या पाण्याच्या बाटल्यांचे बॉक्स प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वरून (मुंबईच्या दिशेकडून) थेट गाड्यांमध्ये चढवले जात असल्याचे पाहणीदरम्यान दिसून आले. यामुळे प्रवाशांना अधिकृत ‌'रेल नीर‌'ऐवजी इतर कंपन्यांचे पाणी विकले जात असल्याने रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.

Pune Railway Station Water Bottle Sale
Pune Water Supply Shutdown: पुणेकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी शहरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा राहणार बंद

इतर ब्रँडच्या बाटल्यामुळे प्रवाशांना जास्त पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना रेल्वेगाडी आणि स्थानकावर प्रवाशांना परवडणाऱ्या रेल नीर कंपनीच्याच बाटल्यांची विक्री केली जावी, अशी मागणी प्रवशांकडून केली जात आहे. तसेच, यासंदर्भात रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी हेमंत कुमार बेहेरा यांना विचारणा केली असता, त्यांनी सध्या रेल नीर कंपनीच्या बाटल्यांचा तुटवडा असल्याचे सांगत, दहा दिवस रेल्वेने मंजुरी दिलेल्या 10 ब्रँडच्या पाण्याच्या बाटल्या पुणे स्थानकावर विकण्यास परवानगी देण्यात आली आहे.

Pune Railway Station Water Bottle Sale
Maharashtra ITI Admission 2026: आयटीआय प्रवेशाला विद्यार्थ्यांचा ‘ब्रेक’; राज्यात यंदा प्रवेश ३२ टक्क्यांनी घटले

आणखी १० दिवस मिळणार इतर ब्रँड्स; त्यानंतर पुन्हा बंदी...

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, इतर ब्रँडच्या बाटल्यांना दिलेली ही परवानगी फक्त पुढील १० दिवसांसाठी लागू असणार आहे. १० दिवसांत ‌'रेल नीर‌'चा पुरवठा पूर्ववत झाल्यानंतर पुणे रेल्वेस्थानकावर इतर सर्व ब्रँड्सच्या पाण्याच्या बाटल्यांच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घातली जाईल, असेही बेहेरा यांनी यावेळी प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले.

Pune Railway Station Water Bottle Sale
Pune Women Police Bribery Cases: पुण्यातील 'लेडी सिंघम'च लाचखोरीच्या जाळ्यात; तीन महिन्यांत तीन महिला पोलिस अधिकाऱ्यांना अटक

सध्या पुणे रेल्वेस्थानकावर ‌ 'रेल नीर‌'च्या पाण्याच्या बाटल्यांचा पुरवठा कमी होत आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही रेल्वेने मंजूर केलेल्या इतर १० ब्रँड्सच्या बाटल्या विक्रीस तात्पुरती परवानगी दिली आहे. या मंजूर १० ब्रँड्सव्यतिरिक्त कोणत्याही अनधिकृत ब्रँडच्या बाटल्यांची विक्री पुणे स्थानकावर होत नाही. जर तसे आढळल्यास संबंधित विक्रेत्यांवर तत्काळ दंडात्मक कारवाई केली जाते.

हेमंत कुमार बेहेरा, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक व जनसंपर्क अधिकारी, पुणे विभाग, मध्य रेल्वे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news