Pune Stray Dog Attack: वाघोली-लोहगावात भटक्या कुत्र्यांची दहशत; चिमुरडीसह ६ नागरिकांवर हल्ले

दादाची वस्ती परिसरात भीतीचे वातावरण; महापालिकेने तातडीने मोहीम राबवून बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी
Stray dog attack
Stray dog attackPudhari
Published on
Updated on

वाघोली: वाघोली-लोहगाव रस्त्यावरील दादाची वस्ती परिसरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे लहान मुले आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या तीन ते चार दिवसांत पाचवर्षीय चिमुरडीसह पाच ते सहा नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Stray dog attack
Pune Water Supply Shutdown: पुणेकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी शहरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा राहणार बंद

दोन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेत परिसरात खेळत असलेल्या पाच वर्षांच्या चिमुरडीवर भटक्या कुत्र्याने अचानक हल्ला करून तिच्या मांडीला चावा घेतला. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत.

Stray dog attack
Maharashtra ITI Admission 2026: आयटीआय प्रवेशाला विद्यार्थ्यांचा ‘ब्रेक’; राज्यात यंदा प्रवेश ३२ टक्क्यांनी घटले

महापालिका शहरातील इतर भागांतून पकडलेली भटकी कुत्रे लोहगाव परिसरात आणून सोडत असल्याचा दावा परिसरातील रहिवाशांनी केला आहे. त्यामुळे या भागात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून, लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Stray dog attack
Pune Women Police Bribery Cases: पुण्यातील 'लेडी सिंघम'च लाचखोरीच्या जाळ्यात; तीन महिन्यांत तीन महिला पोलिस अधिकाऱ्यांना अटक

घराबाहेर पडतानाही भीती वाटत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. महापालिकेने दादाची वस्तीसह संपूर्ण लोहगाव परिसरात विशेष मोहीम राबवून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Stray dog attack
Otur Pickup Driver Dangerous Driving: 'नागीण डान्स' करत पिकअपची जीवघेणी स्टंटबाजी; ओतूर पोलिसांनी चालकावर ठोकला थेट गुन्हा

दादाची वस्तीसह परिसरात अवघ्या तीन-चार दिवसांत एका निष्पाप चिमुरडीसह पाच ते सहा नागरिकांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करणे ही गंभीर बाब आहे. महापालिकेने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात; अन्यथा नागरिकांकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल.

सागर खांदवे, रहिवासी, लोहगाव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news