

पुणे: महापालिकेच्या लष्कर जलशुद्धीकरण केंद्र व पंपिंग स्टेशन येथील विद्युत व यांत्रिकीविषयक देखभाल दुरुस्तीचे कामे येत्या गुरुवारी (दि.३०) करण्यात येणार आहेत. त्यामुळे या दिवशी शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, असे महापालिके कडून कळविण्यात आले आहे.
पाणीपुरवठा बंद असणारा भाग:
रामटेकडी टाकीवरून होणारा पाणीपुरवठा भाग - काळेपडळ, गाडीतळ, गोंधळेनगर, सातववाडी, हडपसर गावठाण (अंशतः), महंमदवाडी गावठाण, वाडकर मळा, कृष्णानगर, राजीव गांधीनगर, तरवडे वस्ती, रामनगर झोपडपट्टी, रामटेकडी परिसर, ससाणेनगर ते १४ गल्ली, हडपसर गावठाण (अंशतः), माळवाडी, मुंढवा, १५ नंबर, मगरपट्टा सिटी, काळेपडळ (रेल्वेच्या उजव्या बाजूस), केशवनगर, साडेसतरा नळी, म्हसोबानगर, काळे बोराटेनगर, हांडेवाडी रोड, भुजबळ वस्ती.
वानवडी २८५ टाकीवरून होणारा पाणीपुरवठा भाग:
वानवडी गावठाण, चौगुले मळा, शिताळादेवी मंदिर व परिसर. बकरी हिल टाकीवरून होणारा पाणीपुरवठा भाग - कोंढवा गावठाण, शिवनेरीनगर, मिठानगर, पारगेनगर, कौसरबाग, साळुंखे विहार, एनआयबीएम रोड, उंड्री रोड, आझादनगर, शांतीनगर, केदारीनगर, काकडे मैदान परिसर, मानेवस्ती, जांभूळकरवस्ती, जगताप चौक व इतर परिसर, विकासनगर, शिंदे छत्री परिसर, राजीव गांधी झोपडपट्टी, आझादनगर, मानेवस्ती, संविधान चौक ते गंगा सॅटेलाईट चौक, सिद्धार्थनगर, उंड्री रस्ता, ब्रम्हा काउंटीज, कोणार्क इंद्रायू.
हाय सर्व्हिस टाकीवरून होणारा पाणीपुरवठा भाग:
बी.टी. कवडे रोड दोन्ही बाजू, भीमनगर, घोरपडी (अंशतः) भारत फोर्ज कंपनीलगतचा परिसर, जांभूळकर मळा, सेंट पेट्रिक टाऊन, शेवकरवस्ती, होले मळा, एस. व्ही. नगर, लक्ष्मीनगर, घोरपडी उर्वरित भाग, तारादात्त कॉलनी, डांबरवाडी, ज्ञानेश्वर पार्क, निगडेनगर, ढोलेवस्ती, सिटाडेल, संपूर्ण पुणे कॅन्टोन्मेंट, कॅम्प वसाहत, कमांड हॉस्पिटल, भीमपुरा गल्ली नं. १ ते २०, मोदीखाना, साचापीर स्ट्रीट, एम. जी. रोड, इस्ट स्ट्रीट, जी. ई. साउथ, सेन्ट्रल.
कॅम्प टाकीवरून होणारा पाणीपुरवठा भाग:
संपूर्ण पुणे कॅन्टोन्मेंट, कॅम्प वसाहत. रेसकोर्स टाकीवरून होणारा पाणीपुरवठा भाग घोरपडी (अंशतः), श्रावस्तीनगर, गुलमोहर पार्क, पासपोर्ट ऑफिस परिसर, कोरेगाव पार्क ब्रिज.
ठाकरसी टाकीवरून होणारा पाणीपुरवठा भाग:
येरवडा गावठाण, इराणी मार्केट, गाडीतळ, गुंजन, साळवे भाजी मार्केट, गवळीवाडा, जिजामाता, मदर तेरेसा, कुमार पर्णकुटी, लमाण तांडा, कामराजनगर, निळा झेंडा, लक्ष्मीनगर, भाटनगर, नूरानी मस्जिद, नेताजीनगर, गांधीनगर, कश्मीर कॉलनी, भीमा शंकर वसाहत, यशवंतनगर, खड्डा झोपडपट्टी, जज्वाला मंडळ, गजराज क्लब, डॉ. आंबेडकर वसतीगृह, सुभाषनगर, नवी खडकी, तालमीपर्यत, बारातेवस्ती, बोसले वस्ती, कुमार आंगण, संगमवाडी, जयजवाननगर, रामनगर, यू. पी. हॉटेल परिसर, अशोकनगर, गांधीनगर, शास्त्रीनगर, बं. नं. ५, नगर रोड, डंकर लाईन, कल्याणीनगर, अधीक्षक बंगला परिसर इ.
लष्कर ते खराडी पंपिंग क्लोजरमुळे पाणीपुरवठा बंद होणारा परीसर:
खराडी गावठाण, आपले घर, तुळजाभवानीनगर, ईऑन परिसर, चौधरीवस्ती, सातववस्ती, थिटेवस्ती, तुकारामनगर, यशवंतनगर, चंदननगर, सुनीतानगर, धर्मनगर, सोमनाथनगर, गार्डेनिया, धनलक्ष्मी सोसायटी, गणेशनगर, आनंदपार्क, राजश्री कॉलनी, मतेनगर, महावीरनगर, माळवाडी, मुन्नुरवार या भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.