पुणे जिल्ह्यात लाभार्थ्यांची दुसरा डोस घेण्यास टाळाटाळ

पुणे जिल्ह्यात लाभार्थ्यांची दुसरा डोस घेण्यास टाळाटाळ
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाची तिसरी लाट ओसरत असल्याचे पाहून पुणेकर दुसरा डोस घेणे टाळत आहेत. पुण्यात दुसर्‍या डोसची तारीख उलटलेल्यांची संख्या ही 13 लाख 84 हजार झाली आहे. ही संख्या इतकी वाढली आहे की, दुसरा डोस
घेणार्‍यांची सर्वाधिक संख्या असणारा पुणे जिल्हा राज्यात आघाडीवर आहे.

पुणे जिल्ह्यात 18 व त्यापेक्षा पुढील वयोगटातील अपेक्षित लाभार्थ्यांची संख्या 83 लाख 42 हजार इतकी आहे. पुण्याने उद्दिष्ट पूर्ण करून त्यापेक्षा 12 लाख अधिक म्हणजे 95 लाख लाभार्थ्यांचे लसीकरण झालेले आहे, तर 75 लाख 64 हजार जणांनी दुसरा डोस घेतला आहे. त्यापैकी दुस-या डोसची मुदत पूर्ण झालेल्यांची संख्या 13 लाख 84 हजार इतकी आहे. यापैकी कोविशिल्डचे 10 लाख 92 हजार, तर कोव्हॅक्सिनचे 2 लाख 92 हजार इतके लाभार्थी आहेत.

पुण्यापाठोपाठ नागपूर (9 लाख 9 हजार), औरंगाबाद (9 लाख 6 हजार), नाशिक (साडेनऊ लाख), ठाणे (9 लाख) व मुंबई (8 लाख 67 हजार) हे जिल्हे दुसरा डोससाठी आघाडीवर आहेत. त्यानंतर कोल्हापूर, अहमदनगर, सोलापूर, जळगाव व अमरावती या जिल्ह्यांमध्ये देखील दुसरा डोस बाकी असणा-यांची संख्या पाच लाखांच्या पुढे आहे.

पुणे जिल्हा राज्यात लसीकरणात आघाडीवर आहे. त्यामुळे दुसर्‍या डोसचे लाभार्थीदेखील जास्त आहेत; तसेच दुसरा डोस घेण्यासाठी नागरिक थोडे दुर्लक्ष करतानाही दिसून येत आहेत.
      – डॉ. संजय देशमुख, सहायक संचालक, पुणे परिमंडळ

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news