Manikdoh Leopard Rescue Centre: माणिकडोह बिबट निवारा केंद्रातील 20 बिबटे गुजरातच्या ‘वनतारा’मध्ये स्थलांतरित

वाढती संख्या लक्षात घेऊन निर्णय; मानव-बिबट संघर्ष कमी करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल
Leopard Safari Project
LeopardPudhari
Published on
Updated on

नारायणगाव: जुन्नर तालुक्यातील माणिकडोह बिबट निवारा केंद्रातील बिबट्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन काही बिबट्यांना गुजरातमधील ‌‘वनतारा‌’ वन्यजीव बचाव व पुनर्वसन केंद्रात स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत शनिवारी (दि. 7) 20 बिबट्यांना विशेष पिंजऱ्यांतून गुजरातकडे रवाना करण्यात आले. यामध्ये 10 नर व 10 मादी बिबट्यांचा समावेश आहे.

Leopard Safari Project
Pune Construction Timing Rule: पुण्यात रात्रीच्या बांधकामांवर बंदी; सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंतच परवानगी

माणिकडोह बिबट निवारा केंद्राची क्षमता मर्यादित आहे. तेथे क्षमतेपेक्षा अधिक बिबटे ठेवण्यात आले आहेत. त्यांची योग्य देखभाल, वैद्यकीय सेवा व व्यवस्थापन करणे वन विभागासमोर मोठे आव्हान ठरले आहे. ही बाब लक्षात घेऊन वन विभागाने तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार काही बिबट्यांना अत्याधुनिक सुविधा असलेल्या गुजरातमधील ‌‘वनतारा‌’ केंद्रात पाठविण्याचा निर्णय घेतला.

Leopard Safari Project
Maharashtra CET Application Correction: विधी, बी.एड-एम.एड, बी.पी.एड सीईटीसाठी 90 हजार विद्यार्थी

बिबट्यांच्या स्थलांतरासाठी विशेष वाहने, सुरक्षित पिंजरे तसेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची टीम तैनात करण्यात आली होती. बिबट्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना आवश्यक औषधोपचार देण्यात आले. त्यानंतर त्यांना गुजरातकडे रवाना करण्यात आले. ही प्रक्रिया वन विभागाच्या देखरेखीखाली पार पडली.

दरम्यान, जुन्नरसह आंबेगाव व शिरूर तालुक्यांत मानव-बिबट संघर्षाच्या घटना वाढत असल्याने या निर्णयाकडे महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिले जात आहे. वन विभागाच्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांत आणखी बिबट्यांचे टप्प्याटप्प्याने स्थलांतर करण्यात येणार आहे. त्यामुळे माणिकडोह केंद्रावरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

Leopard Safari Project
Pune Southern Command Drill: पुण्यात दक्षिण कमांडचा लष्करी-नागरी फ्यूजन सराव

दरम्यान, जन्नर वन विभागामध्ये मागील एक वर्षामध्ये वन्यप्राणी बिबट्यांचे मानवांवरील हल्ल्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. मानव-बिबट संघर्ष क्षेत्रातून पकडण्यात आलेल्या बिबट्यांना माणिकडोह बिबट निवारा केंद्रामध्ये ठेवण्यात आले होते. या केंद्राची क्षमता 50 एवढी असल्याने अतिरिक्त बिबट्यांचे भारतातील इतर संरक्षित ठिकाणी स्थलांतर करणे आवश्यक होते.

येथील 50 बिबट्यांना गुजरात राज्यातील जामनगर येथील वनतारा येथे स्थलांतर करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय प्राणिसंग््राहालय प्राधिकरण, नवी दिल्ली यांना सादर करण्यात आला होता. या प्रस्तावास 20 डिसेंबर 2025 रोजी मंजुरी मिळाली. त्यानुसार प्रक्रिया पार पडल्यानंतर शुक्रवारी (दि. 6) वनतारा येथील 25 सदस्यीय पथक पशुवैद्यकीय अधिकारी गौरव श्रीवास्तव यांच्या नेतृत्वाखाली जुन्नर येथे दाखल झाले होते.

Leopard Safari Project
Pune Nominated Corporators: पुणे महापालिकेत स्वीकृत नगरसेवकपदासाठी 700 अर्ज; नियमांवरून गोंधळ

अप्पर प्रधान मृख्य वनसंरक्षक (वन्यजीव) डॉ. जितेंद्र रामगावकर, वनसंरक्षक पुणे आशिष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली 20 बिबट्यांना (10 नर व 10 मादी) वनताराच्या वातानुकूलित व सुसज्ज रेस्क्यू व्हॅनमधून पाठविण्यात आले. बिबटे स्थानांतरणाची प्रक्रिया उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, लोकेश पाटील, स्मिता राजहंस, अमृत शिंदे, प्रदीप चव्हाण, चैतन्य कांबळे आदींच्या उपस्थितीत पार पडली.

जन्नर वन विभागामार्फत मानव-वन्यप्राणी संघर्ष कमी करण्यासाठी विविध उपाययोजना सातत्याने राबविण्यात येत असून, नागरिकांनी वन विभागास सहकार्य करावे.

प्रशांत खाडे, उपवनसंरक्षक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news