Maharashtra CET Application Correction: विधी, बी.एड-एम.एड, बी.पी.एड सीईटीसाठी 90 हजार विद्यार्थी

अर्जातील चुका दुरुस्तीसाठी 9 ते 11 मार्चदरम्यान ऑनलाईन सुविधा उपलब्ध
CET
CETPudhari
Published on
Updated on

पुणे: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलतर्फे विधी तीन वर्षे, बी.एड-एम.एड व बी.पी.एड या अभ्यासक्रमांच्या सीईटी नोंदणीची मुदत संपली असून, तिन्ही अभ्यासक्रमासांठी 90 हजार 126 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. नोंदणी अर्जात काही दुरुस्त्या असतील तर 9 ते 11 मार्चदरम्यान विद्यार्थ्यांना अर्जात ऑनलाईन पद्धतीने दुरुस्ती करता येणार आहे.

CET
Pune Southern Command Drill: पुण्यात दक्षिण कमांडचा लष्करी-नागरी फ्यूजन सराव

एलएलबी (3 वर्षीय), बी.एड. + एम.एड. व बी.पी.एड.च्या या सामाईक प्रवेश परीक्षेकरिता ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी प्रक्रिया परीक्षा शुल्क भरून पूर्ण केलेली आहे. त्यापैकी काही विद्यार्थांकडून अर्ज भरताना अनवधानाने काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्तीसाठीची ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही दुरुस्तीची सुविधा दि. 9 ते 11 मार्च 2026 दरम्यान उपलब्ध करून देण्यात आली आहे.

CET
Pune Nominated Corporators: पुणे महापालिकेत स्वीकृत नगरसेवकपदासाठी 700 अर्ज; नियमांवरून गोंधळ

विद्यार्थ्यांनी स्वतःच्या लॉगीनमध्ये जाऊन ही दुरुस्ती करायची आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने भरलेल्या अर्जात विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख, छायाचित्र, सही व लिंग यामध्ये दुरुस्ती व बदल करण्याची सुविधा देण्यात येत आहे. एलएल.बी. (3 वर्षीय) या अभ्यासक्रमाच्या सीईटी प्रवेश नोंदणी दिनांक 8 ते 23 जानेवारी 2026 पर्यंत होती. यानंतर 13 फेबुवारीपर्यंत पहिली मुदतवाढ देण्यात आली.

CET
Pune University Chowk Double Decker Flyover: पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाचे आज लोकार्पण

बी.एड. + एम.एड. या अभ्यासक्रमाच्या सीईटीची प्रवेश नोंदणी दिनांक 9 ते 24 जानेवारी 2026 पर्यंत होती. यानंतर 14 फेबुवारीपर्यंत पहिली मुदतवाढ देण्यात आली. बीपीएडच्या या अभ्यासक्रमाच्या सीईटीची प्रवेश नोंदणी 16 जानेवारी ते 2 फेबुवारी 2026 पर्यंत होती. यानंतर 17 फेबुवारीपर्यंत पहिली मुदतवाढ देण्यात आली.

CET
Pune Bharat Mandapam: लोहगावमध्ये ‘भारत मंडपम’ प्रकल्पाला गती; आरक्षण बदलाचा अहवाल राज्याकडे

यानंतर या तिन्ही अभ्यासक्रमांच्या सीईटी प्रवेश नोंदणीला दि. 28 फेबुवारीपर्यंत दुसरी मुदतवाढ आणि तिसरी व अंतिम मुदतवाढ दि. 3 मार्चपर्यंत देण्यात आली होती. यावर्षी एलएलबी (3 वर्षीय) या अभ्यासक्रमास 82,883 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. बीएड + एमएड (3 वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम) या अभ्यासक्रमास 1228 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. बीपीएड या अभ्यासक्रमास 6015 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news