

मंचर: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या ग््राामीण भागात प्रचाराचा धडाका सुरू आहे. मात्र, या निवडणुकीत विकासकामांना महत्त्व न देता पैसा आणि चमकोगिरीवर भर दिला जात आहे. एकंदरीतच नागरी समस्या व विकासाचा मुद्दा अडगळीत पडला आहे.
मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आर्थिक बळाचा वापर केला जात आहे. प्रत्यक्ष विकासाचा लेखाजोखा मांडणारे उमेदवार मागे पडत आहेत. गेल्या कार्यकाळात रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, शेतकरी प्रश्न यासाठी प्रामाणिकपणे काम करणारे अनेक उमेदवार आज प्रचाराच्या झगमगाटात झाकोळले जात आहेत. कामाची माहिती मतदारांपर्यंत पोहोचण्याआधीच दिखाऊ प्रचार करणाऱ्या उमेदवारांनी वातावरण व्यापल्याचे दिसून येते. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये चमकोगिरीचा प्रभाव वाढत आहे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या उमेदवारांना त्याचा सामना करावा लागत आहे, अशी चर्चा ग््राामीण भागात रंगू लागली आहे.
विकासकामांचा मुद्दा दुय्यम ठरत असून, निवडणूक ही केवळ खर्च आणि प्रदर्शनाची स्पर्धा बनत चालली आहे. लोकशाहीसाठी ही बाब चिंताजनक आहे. मतदारांनी विकासाच्या निकषांवर उमेदवारांची निवड न केल्यास भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्थांचा मूळ उद्देशच बाजूला पडण्याची भीती कामगार नेते ॲड. बाळासाहेब बाणखेले यांनी व्यक्त केली.
बहुजन समाज पक्षानेही यंदा प्रथमच ग््राामीण भागात आपले पाय रोवण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी उमेदवारी यादी जाहीर केली आहे. पक्षाचे प्रदेश सचिव काळुराम चौधरी यांनी ही यादी जाहीर केली. बारामती नगरपरिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत बसपाच्या संघमित्रा चौधरी ह्या एक उमेदवार विजयी झाल्या. परिणामी, आता ग््राामीण भागावर पक्षाने लक्ष केंद्रित केले आहे. पक्षाचे शहराध्यक्ष भास्कर दामोदरे यांनी ही माहिती दिली.
जिल्हा परिषद गटासाठी जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये गुणवडी गटातून ऊर्मिला प्रवीण शिंदे, पणदरे गटातून विशाल दिलीप घोरपडे, वडगाव निंबाळकर गटातून अश्विनी रामदास खोमणे, निंबूत गटातून संतोष पोपट कांबळे, तर निरावागज गटातून संजय प्रल्हाद कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पंचायत समिती गणासाठी वडगाव निंबाळकर गणातून दयानंद मोतीराम पिसाळ, पणदरे गणातून विशाल दिलीप घोरपडे, मुढाळे गणातून ऋतुजा दत्ता बरकडे आणि गुणवडी गणातून दिव्या बाळासो कांबळे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. बहुजन समाज पार्टी बारामतीच्या वतीने जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी एकूण नऊ उमेदवार निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत.