Mahesh Mote Apology: तोंडाला काळं फासलं, राज ठाकरेंच्या फोटो समोर लोटांगण घेतलं; महेश मोटेच्या माफीचा VIDEO चर्चेत

Mahesh Mote Raj Thackeray Apology: सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर महेश मोटे यांनी राज ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल अखेर माफी मागितली आहे.
Mahesh Mote Raj Thackeray Apology
Mahesh Mote Raj Thackeray ApologyPudhari
Published on
Updated on

Mahesh Mote Raj Thackeray Apology: सोशल मीडिया इन्फ्लुएंसर महेश मोटे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादानंतर अखेर माफी मागितली आहे. पुण्यातील मनसेच्या कार्यालयात जाऊन महेश मोटे यांनी आपल्या वक्तव्याबद्दल खेद व्यक्त केला. यावेळी त्यांनी स्वतःच्या तोंडाला काळं फासून घेतलं आणि राज ठाकरे यांच्या फोटोसमोर साष्टांग दंडवत घालत माफी मागितली.

काही दिवसांपूर्वी महेश मोटे यांनी सोशल मीडियावरील एका व्हिडीओमध्ये राज ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यांकडून करण्यात आला होता. या वक्तव्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. त्यानंतर महेश मोटे यांनी आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण देत माफी मागितली आहे.

माफी मागतानाचा त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये महेश मोटे भावुक झाल्याचे दिसत असून, त्यांनी आपल्या कृत्याबद्दल पश्चात्ताप व्यक्त केला. ‘रील्स करण्याच्या नादात आपल्याकडून चूक झाली’, असं त्यांनी सांगितलं.

महेश मोटे यांनी राज ठाकरे यांच्यासह मनसेच्या पदाधिकाऱ्यांचीही माफी मागितली. पुण्यातील मनसेचे पदाधिकारी, नगरसेवक साईनाथ बाबर, आशिष साबळे, तापकीर आणि शुभम दादा यांच्यासह पक्षातील इतर पदाधिकाऱ्यांचीही त्यांनी माफी मागितली आहे.

Mahesh Mote Raj Thackeray Apology
Lalbaugcha Raja Darshan Fraud: लालबागच्या राजाच्या थेट दर्शनाचे आमिष महागात पडले! चार भाविकांची फसवणूक; बारावीतील विद्यार्थी अटकेत

तोंडाला काळं फासून व्यक्त केला पश्चात्ताप

आपल्या चुकीबद्दल प्रायश्चित्त म्हणून महेश मोटे यांनी स्वतःच्या तोंडाला काळं फासून घेतलं. यानंतर त्यांनी मनसेच्या कार्यालयात राज ठाकरे यांच्या फोटोसमोर साष्टांग नमस्कार करत माफी मागितली. आपल्याकडून झालेली चूक पुन्हा होणार नाही, असं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

‘रील्सच्या नादात चूक झाली’

माफी मागताना महेश मोटे म्हणाले की, राज ठाकरे यांच्याबद्दल बोलताना आपल्याकडून चूक झाली. सोशल मीडियावर रील्स बनवण्याच्या नादात आपण चुकीचं बोललो आणि त्याचा परिणाम आता आपल्याला भोगावा लागत आहे. या चुकीबद्दल आपण राज ठाकरे आणि संपूर्ण मनसेची माफी मागत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

Mahesh Mote Raj Thackeray Apology
PP Margacha Raja Ganeshotsav: मुस्लिम कुटुंबाकडून सलग १७ वर्षे गणरायाची मनोभावे सेवा; मुंबईच्या कामाठीपुऱ्यातील ‘पी. पी. मार्गाचा राजा’

महेश मोटे यांनी आपल्या वक्तव्याबद्दल मनसेच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडेही माफी मागितली. सोशल मीडियावर काहीही बोलण्यापूर्वी त्याचा परिणाम काय होणार आहे याचा विचार करण्याची गरज असल्याचं या संपूर्ण प्रकरणातून पुन्हा एकदा समोर आलं आहे.

दरम्यान, महेश मोटे यांचा माफी मागतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांच्या या माफीनंतर मनसे कार्यकर्त्यांची भूमिका काय असणार आहे, याकडेही लक्ष लागलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news