Lalbaugcha Raja Darshan Fraud: लालबागच्या राजाच्या थेट दर्शनाचे आमिष महागात पडले! चार भाविकांची फसवणूक; बारावीतील विद्यार्थी अटकेत

लालबागच्या राजाचे रांगेत न उभे राहता थेट चरणस्पर्श दर्शन घडवून आणण्याचे आश्वासन देत चार भाविकांकडून पैसे घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणी काळाचौकी पोलिसांनी बारावीतील विद्यार्थी प्रणव यादव याला अटक केली.
Lalbaugcha Raja
Lalbaugcha RajaPudhari
Published on
Updated on

मुंबई: लालबागच्या राजाचे रांगेत न उभे करता थेट चरणस्पर्श दर्शन घडवून आणण्याचे आमिष दाखवून चार भाविकांची फसवणूक केल्याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी बारावीतील विद्यार्थी प्रणव यादव याला अटक केली. भाविकांकडून पैसे घेऊन त्यांना थेट दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे खोटे आश्वासन दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

गणेशोत्सवाच्या काळात लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईसह देशभरातून मोठ्या संख्येने भाविक येतात. दर्शनासाठी मोठ्या रांगा लागत असल्याने रांगेत न उभे राहता थेट दर्शन मिळावे, अशी अनेक भाविकांची इच्छा असते.

याचाच गैरफायदा घेत प्रणव यादव याने भाविकांना चरणस्पर्श दर्शनासाठी थेट प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन दिल्याचे समोर आले. पोलिसांच्या माहितीनुसार, प्रणवने आणखी काही भाविकांशी संपर्क साधून त्यांना रांगेत उभे राहण्याची गरज नसल्याचे सांगून, लालबागच्या राजाचे थेट चरणस्पर्श दर्शन घडवून आणण्याचे आमिष दाखवत त्यांच्याकडून पैसे घेतले आहेत.

Lalbaugcha Raja
Sahil Wakode Case: IIT बॉम्बे विद्यार्थी मृत्यू प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे; पालकांच्या आंदोलनानंतर निर्णय

यापैकी एका भाविकाकडून ८५० रुपये घेतल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, पैसे घेतल्यानंतर आश्वासनाप्रमाणे दर्शनाची व्यवस्था करण्यात आली नाही.त्यानंतर एका भाविकाने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर काळाचौकी पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान प्रणव यादव याचे नाव समोर आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

दर्शन फक्त दोन ते अडीच तासात; भूलथापांना बळी पडू नका

सध्या मुंबईत गणेश दर्शनासाठी अभूतपूर्व गर्दी उसळली असली तरी लालबागचा राजा गणेश मूर्तीचे मुख व चरणस्पर्श दर्शन घेण्यासाठी भक्तांना दोन ते अडीच तास लागतात. त्यामुळे भक्तांनी मुख व चरण स्पर्श रांगेतून लालबागचा राजाचे दर्शन घ्यावे, असे लालबाग सार्वजनिक गणेश तरुण मंडळ व पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Lalbaugcha Raja
Devendra Fadnavis on UPI Charges: UPI शुल्कावर फडणवीसांची स्पष्ट भूमिका; व्यापारी-पेट्रोल पंपधारकांना म्हणाले, ‘विरोध करू नका’

दर्शनासाठी परजिल्ह्यातून येणाऱ्या गणेश भक्तांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन काळाचौकी पोलीस ठाण्याने केले आहे. तशा आशयाचे फलक लालबाग मुख्य रस्त्यावर देखील लावण्यात आले आहेत. या वर्षी प्रथमच लालबागच्‍या राजाच्‍या दर्शनाचा वापर भक्‍तांना फसवण्‍यसाठी झाल्‍याचे उदाहरण समोर आले. त्‍यामुळे पोलिसही चकीत झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news