Pune News : महर्षी कर्वेंचा पुतळा स्थलांतराची याचिका फेटाळली

Pune News : महर्षी कर्वेंचा पुतळा स्थलांतराची याचिका फेटाळली
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कर्वे रस्त्यावरील महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा चौकातील पुतळा काढून तो दुसर्‍या ठिकाणी स्थलांतरित करण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. या पुतळ्याच्या मागे असलेले होर्डिंग काढण्याची नोटीस दिल्यानंतर जागामालकाने थेट पुतळा हटविण्याची मागणी याचिकेद्वारे केली होती. महिलांचे शिक्षण, विधवा पुनर्विवाह यासाठी संपूर्ण आयुष्य वाहणार्‍या महर्षी कर्वे यांचा पुतळा महापालिकेने कर्वेनगर आणि कोथरूड यांच्या सीमेवर उभारला आहे.

महापालिकेने तीन वर्षांपूर्वीच या पुतळ्याचे नूतनीकरण केले होते. या पुतळ्याच्या मागे आकाशचिन्ह विभागाची परवानगी असलेले जाहिरात फलक (होर्डिंग) आहेत. या जाहिरात फलकांमुळे पुतळ्याच्या शोभेला बाधा येत असल्याच्या तक्रारी नागरिकांसह काही राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांकडून पालिकेकडे केल्या जात होत्या.

या तक्रारींची दखल घेत हे होर्डिंग काढून टाकण्यासंबंधीची नोटीस पालिकेने जागामालकास दिली होती. त्यावर जागामालक इंदुमती बोरसे यांनी मात्र थेट सदर पुतळाच दुसर्‍या ठिकाणी हलविण्यात यावा, असा पवित्रा घेतला होता. त्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात पालिकेविरोधात याचिका दाखल केली होती. महापालिकेने मांडलेली बाजू ग्राह्य मानत उच्च न्यायालयाने सदर याचिका फेटाळली असल्याची माहिती महापालिकेच्या विधी सल्लागार अ‍ॅड. निशा चव्हाण यांनी दिली.

पुतळ्याचा कोणताही अडथळा नाही

या याचिकेत पुतळा हा रस्ता रुंदीकरणासाठी ताब्यात घेतलेल्या जागेत उभा केला. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला होता. तसेच हा पुतळा जवळील दीड किलोमीटरवर असलेल्या जागी स्थलांतरित करावा, अशी मागणी बोरसे यांनी होती. या याचिकेवर पालिका प्रशासनाने वाहतूक पोलिसांपासून संबंधित सर्व विभागांचे अभिप्राय न्यायालयापुढे मांडले. त्यात या पुतळ्यामुळे वाहतुकीस अडथळा होत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news