Maharashtra Online Attendance Typing Exam: टायपिंग-लघुलेखन परीक्षांसाठी ऑनलाइन हजेरी अनिवार्य; मोबाईल ॲप लवकरच सुरू

जीओ-फेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर; डमी विद्यार्थ्यांना बसणार आळा
Online Attendance
Online AttendancePudhari
Published on
Updated on

गणेश खळदकर

पुणे: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येत असलेल्या संगणक टायपिंग, लघुलेखन परीक्षेसह अन्य परीक्षांसाठी आता विद्यार्थ्यांची ऑनलाइन हजेरी घेण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य परीक्षा परिषदेकडून मोबाईल अटेंडन्स ॲप विकसित करण्यात आले असून, लवकरच ते कार्यान्वित करण्यात येणार आहे. राज्यातील तीन हजार संस्थांना संबंधित ॲप मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे. या ॲपद्वारे तब्बल दीड ते दोन लाख विद्यार्थ्यांची दररोज ऑनलाइन हजेरी नोंदविली जाणार असल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Online Attendance
Maharashtra School Self Assessment: शाळांच्या स्वयंमूल्यांकनाला 15 मेपर्यंत मुदतवाढ; 26 हजारांहून अधिक शाळा प्रलंबित

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात टायपिंग परीक्षेत तोतया विद्यार्थी बसविण्याचे प्रमाण वारंवार उघडकीस आले आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी आता संस्थेत संबंधित अभ्यासक्रमाला बसलेल्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन हजेरी नोंदविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. साधारण सहा महिने संबंधित विद्यार्थी संस्थेत दररोज एक तास सरावासाठी येतो. संस्थेत टायपिंग परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची नोंदणी करणे बंधनकारक करण्यात येणार आहे. जीओ फेन्सिंग या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संस्थेच्या परिघातील 30 मीटरमध्ये संबंधित विद्यार्थी आला की त्याची हजेरी नोंदविली जाणार आहे.

Online Attendance
Purandar Airport Land Acquisition: पुरंदर विमानतळासाठी भूसंपादनाला वेग; शेतकऱ्यांना एकराला 1.61 कोटींचा मोबदला

मोबाईलवर हजेरी बंधनकारक असल्यामुळे विद्यार्थ्यांना सरावासाठी संस्थेत यावेच लागणार आहे. त्यामुळे डमी विद्यार्थी तसेच केवळ परीक्षेलाच हजेरी लावणाऱ्या विद्यार्थ्यांना आता कायमचा आळा बसणार आहे. तसेच, सरावासाठी येणारा विद्यार्थी आणि परीक्षेला बसणारा विद्यार्थी एकच आहे का? याची पडताळणी या ऑनलाईन हजेरीच्या माध्यमातून केली जाणार आहे. त्यामुळे परीक्षेच्या वेळी बायोमेट्रिक किंवा फेसरीडिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्याची आवश्यकताच राहणार नाही. विद्यार्थ्याने एकदा परीक्षा शुल्क तसेच अभ्यासक्रमाचे शुल्क भरल्यानंतर राज्य परीक्षा परिषदेकडूनच संबंधित विद्यार्थ्यांची माहिती संस्थेला दिली जाणार आहे. त्यामुळे संस्थाचालकांना त्या विद्यार्थ्यांची माहिती भरण्याची आवश्यकता राहणार नसल्याचे देखील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Online Attendance
Pune Property Tax Scam: पुण्यात मालमत्ता कर घोटाळा; 23 गावांत कागदावर उभ्या इमारतींचा धक्कादायक प्रकार

एका विषयासाठी एक तास

एका विषयासाठी एक तास, अशा प्रकारे विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदविली जाणार असून, यापुढे विद्यार्थ्यांची कायमस्वरूपी ऑनलाइन हजेरी नोंदविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना संस्थेत आल्यानंतर आणि जाताना इन-आऊट करावे लागणार आहे. त्यामुळे राज्य परीक्षा परिषदेला देखील कोणत्याही वेळी राज्यातील कोणत्या संस्थेत किती विद्यार्थी उपस्थित आहेत, याची रिअल टाइम माहिती मिळणार असल्याचे देखील अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे.

Online Attendance
Pune Water Cut Decision: पुण्यात 31 मेपर्यंत पाणीकपात नाही; उशिरा पावसाच्या पार्श्वभूमीवर नियोजन

टंकलेखन आणि लघुलेखनासाठी संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन हजेरी नोंदविण्यासाठी मोबाईल अटेंडन्स ॲप राज्य परीक्षा परिषदेने विकसित करून घेतले आहे. या ॲपची सध्या टेस्टिंग सुरू असून, ते लवकरच कार्यान्वित केले जाणार आहे. संबंधित ॲप संस्थांना मोफत उपलब्ध केले जाणार असून, त्यासाठी संस्थांकडून कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही. परंतु, यामार्फत विद्यार्थ्यांची हजेरी मात्र बंधनकारक केली जाणार आहे.

डॉ. नंदकुमार बेडसे, अध्यक्ष, राज्य परीक्षा परिषद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news