Maharashtra School Self Assessment: शाळांच्या स्वयंमूल्यांकनाला 15 मेपर्यंत मुदतवाढ; 26 हजारांहून अधिक शाळा प्रलंबित

जनगणनेच्या कामामुळे निर्णय; 81 हजार शाळांनी पूर्ण केले मूल्यांकन
School
SchoolPudhari
Published on
Updated on

पुणे: राज्यातील जनगणनेच्या कामामुळे शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखड्यातील (स्क्वॉफ) शाळांच्या स्वयंमूल्यांकनाला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता शाळांना स्वयंमूल्यांकनासाठी 15 मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, अद्याप 26 हजार 189 शाळांचे स्वयंमूल्यांकन प्रलंबित असल्याचे उघडकीस आले आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या सहसंचालक डॉ. कमलादेवी आवटे यांनी याबाबतच्या सूचना परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत.

School
Purandar Airport Land Acquisition: पुरंदर विमानतळासाठी भूसंपादनाला वेग; शेतकऱ्यांना एकराला 1.61 कोटींचा मोबदला

राज्यातील सर्व शाळांचे मूल्यांकन करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद येथे ‌‘राज्य शाळा मानक प्राधिकरण कक्षा‌’ची स्थापना करण्यात आली आहे. राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखड्याची निर्मिती करण्यात आलेली आहे.

School
Pune Property Tax Scam: पुण्यात मालमत्ता कर घोटाळा; 23 गावांत कागदावर उभ्या इमारतींचा धक्कादायक प्रकार

सन 2024-25 मधील स्वयं मूल्यांकन पूर्ण करण्यात आले आहे. सन 2025-2026 मधील शाळांची मूल्यांकन प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यानुसार 27 फेबुवारीपर्यंत शाळांनी स्वयं-मूल्यांकन करण्यासाठी पूर्वतयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

School
Pune Water Cut Decision: पुण्यात 31 मेपर्यंत पाणीकपात नाही; उशिरा पावसाच्या पार्श्वभूमीवर नियोजन

81 हजार 903 शाळांचे स्वयंमूल्यांकन पूर्ण

शाळांच्या स्वयंमूल्यांकनासाठी संकेतस्थळावर मूल्यांकनासाठीचा दुवा 16 मार्च ते 15 एप्रिल या कालावधीत उपलब्ध करून देण्यात आला होता. मात्र, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या मागणीमुळे 1 मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. 27 एप्रिल रोजीच्या अहवालानुसार 81 हजार 903 शाळांनी स्वयंमूल्याकन पूर्ण केले असून, 26 हजार 189 शाळांनी स्वयंमूल्यांकन पूर्ण केलेले नाही, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

School
Pune Flood Control Project Delay: पुण्यात पूरनियंत्रण प्रकल्प रखडला; 200 कोटींच्या कामांपैकी फक्त 8 ठिकाणी सुरुवात

जनगणनेच्या कामामुळे मिळाली अंतिम मुदतवाढ

आता जनगणनेच्या कामामुळे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी स्वयंमूल्यांकनास मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. त्यानुसार स्वयंमूल्यांकनासाठी 15 मेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. मात्र, ही मुदतवाढ अंतिम असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या मुदतीत शाळांना माहिती भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news