Purandar Airport Land Acquisition: पुरंदर विमानतळासाठी भूसंपादनाला वेग; शेतकऱ्यांना एकराला 1.61 कोटींचा मोबदला

7 मेपासून मोबदला वाटप सुरू; ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये प्रकल्पाला प्रत्यक्ष सुरुवात
Purandar Airport Project
Purandar Airport ProjectPudhari
Published on
Updated on

पुणे: पुरंदर तालुक्यात प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमिनीच्या भूसंपादनास अखेर गती मिळाली असून, शेतकऱ्यांसाठी आकर्षक पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. या पॅकेजनुसार संबंधित सात गावांतील जमीनमालकांना प्रतिएकर तब्बल 1 कोटी 61 लाख 1 हजार रुपये इतका मोबदला देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे प्रकल्पग््रास्त शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

Purandar Airport Project
Pune Property Tax Scam: पुण्यात मालमत्ता कर घोटाळा; 23 गावांत कागदावर उभ्या इमारतींचा धक्कादायक प्रकार

डुडी म्हणाले की, पुणेकरांसाठी ‌‘गेमचेंजर‌’ ठरणाऱ्या या विमानतळ प्रकल्पाचे काम ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान सुरू करण्याचे नियोजन आहे. पुढील तीन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा शासनाचा मानस आहे. भूसंपादन प्रक्रियेसाठी सात गावांतील शेतकऱ्यांशी समन्वय साधण्यात येत असून, अनेकांनी सकारात्मक भूमिका घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

Purandar Airport Project
Pune Water Cut Decision: पुण्यात 31 मेपर्यंत पाणीकपात नाही; उशिरा पावसाच्या पार्श्वभूमीवर नियोजन

या पॅकेजमध्ये फळबागा असलेल्या जमिनींसाठी दुप्पट दर देण्याची तरतूद केली आहे. तसेच विहीर, बोअरवेल यांसारख्या साधनांसाठी स्वतंत्र दर निश्चित करण्यात आले आहेत. बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावर सरासरी दोन कोटी रुपयांच्या आसपास रक्कम जमा होईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. करारनामा पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना आरटीजीएसद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात मोबदला जमा केला जाणार आहे.

Purandar Airport Project
Pune Flood Control Project Delay: पुण्यात पूरनियंत्रण प्रकल्प रखडला; 200 कोटींच्या कामांपैकी फक्त 8 ठिकाणी सुरुवात

दरम्यान, 7 मेपासून प्रत्यक्ष पैसे देण्यास सुरुवात करण्यात येणार असून, 10 जूनपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय आणि सासवड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठी सात स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली असून, भूसंपादन प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

Purandar Airport Project
Purandar Fake Baba Fraud: पुरंदरमध्ये भोंदूबाबांचा सुळसुळाट; श्रद्धाळूंची आर्थिक पिळवणूक वाढली

ज्या शेतकऱ्यांची संमती असेल त्यांनाच या टप्प्यात मोबदला दिला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे दीर्घकाळ रखडलेल्या पुरंदर विमानतळ प्रकल्पाला आता गती मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.

महत्त्वाचे मुद्दे

  • 7 मेपासून पैसे देण्यास सुरुवात

  • 10 जूनपर्यंत भूसंपादन पूर्ण करणार

  • ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये प्रत्यक्षात कामाला सुरुवात

काही लोक शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत. अधिकची रक्कम मिळवून देण्याचे आश्वासन देत आहेत. शासनाच्या नियमानुसार पैसांचे वाटप करण्यात येईल. चुकीची माहिती पसरविणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात येतील. तशा सूचना पोलिसांना दिलेल्या आहेत. शेतकऱ्यांना मिळालेल्या पैशांची गुंतवणूक करण्यासाठी गोखले संस्थेकडून प्रशिक्षण देण्यात येईल. याच फॉर्मर कंपनीकडून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात येईल.

जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news