Rabies Vaccine Shortage: राज्यातील १२६ सरकारी रुग्णालयांत रेबीज लसच नाही; ३७५ रुग्णालयांत इम्युनोग्लोबुलिनचा तुटवडा

कुत्रा चावल्यानंतर उपचारांचा प्रश्न ऐरणीवर; ३१ ऑक्टोबरपर्यंत पुरेसा साठा उपलब्ध करण्याचे आरोग्य विभागाचे निर्देश
Rabies Vaccine
Rabies VaccinePudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: राज्यात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त होत असतानाच सरकारी रुग्णालयांमधील रेबीज प्रतिबंधक औषधांचा तुटवडा समोर आला आहे. राज्यातील १२६ सरकारी रुग्णालयांमध्ये रेबीज प्रतिबंधक लस (एआरव्ही) उपलब्ध नसून, तब्बल ३७५ रुग्णालयांमध्ये रेबीज इम्युनोग्लोबुलिनचा (आरआयजी) साठा संपला आहे. त्यामुळे कुत्रा चावल्यानंतर वेळेत उपचार मिळण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Rabies Vaccine
Tuberculosis Drug Resistance Testing: पुण्यात क्षयरोगाच्या औषध-प्रतिरोधाचा जनुकीय शोध; ससून रुग्णालयात प्रथमच टीएनजीएस चाचणी

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या १६ ऑक्टोबरच्या पत्रातून ही बाबसमोर आली असून, आरोग्य सचिव निपूण विनायक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये दोन्ही औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. विभागाच्या आकडेवारीनुसार, तपासणीतील ६३३ रुग्णालयांपैकी १२६ रुग्णालयांत एआरव्ही उपलब्ध नाही. म्हणजेच जवळपास प्रत्येक पाचपैकी एका रुग्णालयात रेबीज प्रतिबंधक लस नाही. तर ३७५ रुग्णालयांत आरआयजी उपलब्ध नसल्याने परिस्थिती अधिक गंभीर आहे.

Rabies Vaccine
Pune Dengue Cases: पुण्यात डेंग्यूचा रुग्णालयांवर ताण; खाटांसाठी प्रतीक्षा, आठवर्षीय मुलीच्या रक्तनमुन्यांची फेरतपासणी

केवळ २५८ रुग्णालयांमध्ये या औषधाचा साठा आहे. रेबीज हा लक्षणे दिसू लागल्यानंतर जवळपास नेहमीच प्राणघातक ठरणारा आजार आहे. त्यामुळे कुत्रा किंवा अन्य संशयित प्राण्याने चावा घेतल्यानंतर जखम तातडीने साबण आणि वाहत्या पाण्याने किमान १५ मिनिटे धुणे आणि वैद्यकीय उपचार घेणे अत्यावश्यक आहे.

Rabies Vaccine
Diwali Inflation In Maharashtra: दिवाळीत महागाईचा भडका; तूरडाळ १६० रुपये, गावरान मटकी २०० रुपये किलो

जखमेचे स्वरूप आणि पूर्वीच्या लसीकरणानुसार डॉक्टर एआरव्ही आणि आरआयजी देण्याचा निर्णय घेतात. आरआयजीची गरज असलेल्या रुग्णांसाठी त्याचा तुटवडा उपचारांतील महत्त्वाचा अडथळा ठरण्याची शक्यता वर्तवली गेली. त्यामुळे ३१ ऑक्टोबरपर्यंत सर्व सरकारी रुग्णालयांत दोन्ही औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून द्यावा.

Rabies Vaccine
Someshwar Sugar Factory Chairman: सोमेश्वर कारखान्याच्या अध्यक्षपदासाठी सात नावे चर्चेत; सुनेत्रा पवार कोणाला संधी देणार?

तसेच, नियमित पुरवठा कायम राहील, यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांना सूचना द्याव्यात, असे निर्देश आरोग्य सचिव निपुण विनायक यांनी दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या भटक्या कुत्र्यांशी संबंधित प्रकरणातील आदेशांच्या पार्श्वभूमीवरही हा तुटवडा महत्त्वाचा ठरतो. आता आरोग्य विभाग निर्धारित मुदतीत पुरवठा सुरळीत करून रुग्णांना वेळेत उपचार मिळवून देणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news