Maharashtra Heavy Rain Alert: महाराष्ट्रात पुढील 48 तास अतिवृष्टीचा इशारा; जिल्हानिहाय अलर्ट एका क्लिकवर

मान्सून पुन्हा सक्रिय; अनेक जिल्ह्यांत जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
Rain
Maharashtra RainDeepal Salvi| Pudhari
Published on
Updated on

पुणे: राज्यात गेल्या 48 तासापासून संततधार पाऊस सुरू असून पुन्हा आगामी 48 तास अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा इन्सॅट थ्री डी आर या उपग्रहाने काढलेल्या छायाचित्राद्वारे हवामान खात्याने दिला आहे.

Rain
Expired Soft Drinks: कर्वेनगरमध्ये हजारो मुदतबाह्य शीतपेयांच्या बाटल्या; कारवाईच्या भीतीने साठा फेकल्याचा संशय

पुढील 48 तास महाराष्ट्रात मान्सून सक्रिय राहणार असून कोकण, घाटमाथा, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांत जोरदार पावसाचा अंदाज आहे.भारतात नैऋत्य मान्सून सक्रिय अवस्थेत आहे. मध्य भारत, पश्चिम किनारपट्टी, गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रावर दाट ढग दिसत आहेत. बंगालच्या उपसागरातून मोठ्या प्रमाणात आर्द्रता येत असून पश्चिम किनारपट्टीवर ऑफ-शोअर ट्रफ सक्रिय आहे. त्यामुळे पुढील 48 तासांत महाराष्ट्रातील अनेक भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे.

Rain
Kothrud Shastrinagar Crematorium Roof Leak: कोथरूड शास्त्रीनगर स्मशानभूमीत गळक्या छतामुळे नागरिक त्रस्त

महाराष्ट्रातील पुढील 48 तासांचा अंदाज

  • कोकण विभाग (मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग)या ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार

  • काही भागांत मुसळधार पाऊस (100 मिमीपेक्षा जास्त) होण्याची शक्यता.

  • नदी-नाले दुथडी भरून वाहण्याची शक्यता.

Rain
MTDC Tourism Occupancy 2025-26: एमटीडीसी निवासस्थानांची ऑक्युपन्सी जाहीर; उत्पन्न व पर्यटन वाढ

मध्य महाराष्ट्र (पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर) मध्यम ते जोरदार पाऊस

  • घाटमाथ्यावर अतिवृष्टीची शक्यता.

  • सांगली, सातारा, कोल्हापूरमध्ये अधूनमधून जोरदार सरी.

  • मराठवाडा (छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव)पुढील 24 तासांत हलका ते मध्यम पाऊस.

  • पुढील 24-48 तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता.

  • जालना, छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार सरी.

  • जाफराबाद आणि सिल्लोड तालुक्यांत दुपारनंतर आणि रात्री पावसाच्या सरींची शक्यता.

Rain
Pune Experiential Cultural Tourism: ‘अनुभवायचं पुणं’ ट्रेंडमुळे पुणे ठरतेय सांस्कृतिक पर्यटनाचे केंद्र

विदर्भ (अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर)जोरदार पावसाची शक्यता

  • पूर्व विदर्भात मध्यम ते जोरदार पाऊस.

  • गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया येथे काही ठिकाणी अतिजोरदार पावसाची शक्यता.

  • पश्चिम विदर्भात मध्यम स्वरूपाचा पाऊस.

  • उत्तर महाराष्ट्र (नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव)नाशिक व नंदुरबार जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता.

  • जळगाव आणि धुळ्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस.

  • घाट परिसरात धुके आणि सतत रिमझिम पाऊस.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news