MTDC Tourism Occupancy 2025-26: एमटीडीसी निवासस्थानांची ऑक्युपन्सी जाहीर; उत्पन्न व पर्यटन वाढ

2025-26 मधील पर्यटन निवासांच्या आकडेवारीनुसार काही ठिकाणी चांगला प्रतिसाद; उत्पन्नातही वाढ नोंदवली गेली
MTDC Resorts
MTDC ResortsPudhari
Published on
Updated on

पुणे: महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अखत्यारीतील पर्यटन निवासस्थानांमध्ये वेळोवेळी दुरुस्ती, नूतनीकरण, नियमित देखभाल, सुरक्षा उपाययोजना आणि पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा सातत्याने उपलब्ध करून दिल्या जात आहेत. राज्यातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी आणि पर्यटकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी विविध सुधारणा सातत्याने राबविण्यात येत आहेत.

MTDC Resorts
Pune Experiential Cultural Tourism: ‘अनुभवायचं पुणं’ ट्रेंडमुळे पुणे ठरतेय सांस्कृतिक पर्यटनाचे केंद्र

महामंडळाच्या पर्यटक निवासगृहांमध्ये पर्यटकांची समाधानकारक उपस्थिती असून, काही नव्या पर्यटन निवासांचेही संचालन सुरू केले आहे. यामध्ये दाजीपूर, नळेश्वर, टिपेश्वर, सह्याद्री, खारेपाटण, खिंडसी आणि नरसी नामदेव येथील पर्यटन निवासांचा समावेश आहे.

MTDC Resorts
PMPML Palkhi Bus Service: आळंदी व देहू पालखीसाठी पीएमपीकडून जादा बससेवा; ५ ते ११ जुलै विशेष नियोजन

एमटीडीसीने दिलेल्या माहितीनुसार, सन २०२५-२६ मध्ये प्रमुख पर्यटक निवासांची ऑक्युपन्सी पुढीलप्रमाणे आहे, तारकर्ली - ७१ टक्के, गणपतीपुळे - ७४ टक्के, भंडारदरा - ७० टक्के, खारघर - ६० टक्के, अजिंठा - ६० टक्के, शिर्डी - ५४ टक्के, अजिंठा टी पाईंट- ६० टक्के, हरिहरेश्वर- ३५ टक्के, तारकर्ली- ३७ टक्के (दोन वेळा दिली आहे.), ग्रेप पार्क- ४५ टक्के, वेळणेश्वर ४२ टक्के अशी राहिली आहे. मागील वर्षी एमटीडीसीला एकूण ५७.०२ कोटी उत्पन्न मिळाले असून, १२.४७ कोटी निव्वळ नफा झाला आहे. राष्ट्रीय स्तरावरील सरासरी हॉटेल ऑक्युपन्सी सुमारे ६३ टक्के असताना एमटीडीसीच्या प्रमुख पर्यटक निवासांची कामगिरी त्यापेक्षा चांगली असल्याचेही महामंडळाने स्पष्ट केले आहे.

MTDC Resorts
Roti Ghat Palkhi Preparation: दौंडमधील रोटी घाट संत तुकाराम महाराज पालखीसाठी सज्ज; फुलांनी सजलेला घाट आकर्षण ठरतोय

महामंडळाचे उद्दिष्ट केवळ व्यावसायिक नफा मिळविणे नसून, राज्यातील पर्यटनाचा सर्वांगीण विकास, नव्या पर्यटनस्थळांचा विकास, दुर्गम भागांमध्ये पर्यटनाला चालना देणे, स्थानिक रोजगारनिर्मिती आणि पर्यटकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे आहे. पर्यटक निवासांबाबत सेवा, स्वच्छता, भोजन व्यवस्था आणि कर्मचार्‍यांच्या वर्तणुकीबाबत करण्यात आलेले उल्लेख कोणत्याही अधिकृत सर्वेक्षण, लेखापरीक्षण किंवा वस्तुनिष्ठ अभ्यासावर आधारित नसून वैयक्तिक स्वरूपाचे असल्याचे एमटीडीसीने स्पष्ट केले आहे.

MTDC Resorts
Pune Rural Police Wari Security: आषाढी वारीसाठी पुणे ग्रामीण पोलिसांचा कडक बंदोबस्त; ५ हजार पोलिस तैनात

एमटीडीसीच्या अधिकाऱ्यांनी केवळ फक्त आणि फक्त २०२५-२६ या वर्षाची माहिती दिली आहे. ती पण जिथे अ‍ॅक्युपेशी चांगली आहे. त्या ठिकाणची आकडेवारी दिली आहे, त्याचबरोबर या विभागातील अधिकाऱ्यांनी माथेरान, महाबळेश्वर येथील निवासास्थानाबाबत तोंडाला कुलूप लावले आहे. तसेच, हरिहरेश्वर, तारकर्ली, शिर्डी येथील दिलेली अ‍ॅक्युपेशी खूप कमी आहे, या भागात वर्षभर पर्यटक येतात. विशेष म्हणजे तारकर्ली निवासस्थानाबाबत दिलेले माहिती दोन वेळा दिली आहे. परिणामी, या विभागाने दिलेली माहिती संशयास्पद आहे.

विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news