Expired Soft Drinks: कर्वेनगरमध्ये हजारो मुदतबाह्य शीतपेयांच्या बाटल्या; कारवाईच्या भीतीने साठा फेकल्याचा संशय

अन्न व औषध प्रशासनाच्या धाडसत्रानंतर अज्ञात व्यावसायिकाने मोकळ्या जागेत साठा टाकल्याची शक्यता; चौकशी सुरू
Expired Soft Drinks
Expired Soft DrinksPudhari
Published on
Updated on

वारजे: अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभर भेसळ व नियमभंग करणाऱ्यांविरोधात कारवाईचा धडाका लावला आहे. पुणे शहरातही विविध ठिकाणी सुरू असलेल्या धाडसत्रांमुळे काही व्यावसायिकांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर कर्वेनगर येथे मुदतबाह्य शीतपेयांचा मोठा साठा मोकळ्या जागेत टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Expired Soft Drinks
Kothrud Shastrinagar Crematorium Roof Leak: कोथरूड शास्त्रीनगर स्मशानभूमीत गळक्या छतामुळे नागरिक त्रस्त

कर्वेनगर परिसरातील वनदेवी मंदिराशेजारील मोकळ्या जागेत टेम्पोतून आणून हजारो शीतपेयांच्या प्लास्टिक बाटल्या टाकण्यात आल्या आहेत. विविध कंपन्यांच्या असलेल्या या शीतपेयांच्या बाटल्यांची मुदत संपलेली आहे.

Expired Soft Drinks
MTDC Tourism Occupancy 2025-26: एमटीडीसी निवासस्थानांची ऑक्युपन्सी जाहीर; उत्पन्न व पर्यटन वाढ

अन्न व औषध प्रशासनाने वारजे, कर्वेनगर आणि कोथरूड परिसरात गुटखाविक्रेत्यांसह नियमभंग करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई केली आहे. त्यामुळे कारवाईच्या भीतीने हा मुदतबाह्य शीतपेयांचा साठा गुपचूप मोकळ्या जागेत टाकण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सामाजिक कार्यकर्ते अशोक कदम यांनी सांगितले की, हा साठा हजारो बाटल्यांचा असून, तो लोकवस्तीच्या अगदी जवळ टाकण्यात आला आहे.

Expired Soft Drinks
Pune Experiential Cultural Tourism: ‘अनुभवायचं पुणं’ ट्रेंडमुळे पुणे ठरतेय सांस्कृतिक पर्यटनाचे केंद्र

या बाटल्या लहान मुलांच्या हाती लागून त्यांनी अनवधानाने त्यातील पेय प्राशन केल्यास विषबाधेचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. तसेच मोठ्या प्रमाणावरील प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्यावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी.

Expired Soft Drinks
PMPML Palkhi Bus Service: आळंदी व देहू पालखीसाठी पीएमपीकडून जादा बससेवा; ५ ते ११ जुलै विशेष नियोजन

आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईच्या भीतीने अज्ञात व्यावसायिकाने मुदतबाह्य शीतपेयांचा साठा या ठिकाणी आणून टाकला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणाची माहिती घेऊन संबंधितांचा शोध घेत योग्य ती कारवाई करण्यात येईल.

नितीन लोखंडे, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news