Maharashtra Government Books Online: महाराष्ट्र शासनाची दुर्मीळ पुस्तके आता ऑनलाइन उपलब्ध; घरपोच मिळणार शासकीय प्रकाशने

महाआयटीमार्फत स्वतंत्र विक्री प्रणाली सुरू; ऐतिहासिक, संशोधनपर व संदर्भग्रंथ खरेदीची वाचकांना डिजिटल सुविधा उपलब्ध
Book
Book Pudhari
Published on
Updated on

पुणे: राज्य शासनाच्या विविध विभागांनी गेल्या काही वर्षात प्रकाशित केलेली दुर्मीळ, ऐतिहासिक आणि संदर्भमूल्य असलेली शासकीय पुस्तके आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहेत. शासनाने महाआयटीच्या माध्यमातून स्वतंत्र ऑनलाइन विक्री प्रणाली सुरू केली असून, राज्यातीलच नव्हे तर देशभरातील वाचकांना शासकीय पुस्तके थेट घरपोच मिळणार आहेत.

Book
Ketan Agarwal Murder Case: केतन अगरवाल खून प्रकरणात बीड कनेक्शन उघड; मित्राची पोलिसांकडून कसून चौकशी

साहित्य, संस्कृती, इतिहास, पुरातत्व, प्रशासन, अर्थकारण तसेच विविध विषयांवरील महत्त्वपूर्ण पुस्तके, अहवाल, कोश आणि संशोधनपर प्रकाशने यापूर्वी प्रामुख्याने शासकीय ग्रंथालये किंवा पुस्तक प्रदर्शनांतूनच उपलब्ध होत होती. मात्र, आता या प्रकाशनांची ऑनलाइन खरेदीची सुविधा उपलब्ध करून दिल्याने वाचकांसाठी ज्ञानसंपदेची दारे अधिक व्यापकपणे खुली झाली आहेत. यासंदर्भात उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागाने शासन निर्णय जारी केला आहे.

Book
Pune Ransom Case Arrest: पुण्यात ५० कोटी खंडणी व गोळीबार प्रकरणातील आरोपी राजस्थान-पंजाब सीमेवरून अटक

त्यानुसार महाआयटीने विकसित केलेल्या https:///mahapublications.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून शासकीय प्रकाशनांची ऑनलाइन विक्री करण्यात येणार आहे. खासगी प्रकाशकांच्या धर्तीवर ऑनलाइन पुस्तके विक्रीचा शासनाचा हा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे.

Book
Pune Fake Land Order Scam: हवेली तालुक्यात बनावट शासकीय आदेशांचा मोठा घोटाळा; महसूल विभागात खळबळ

या सुविधेमुळे शासकीय आणि विश्वासार्ह संदर्भग्रंथ सहज उपलब्ध होणार असून, दुर्मीळ साहित्य सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचण्यास मोठी मदत होणार आहे. त्यामुळे ग्रंथालये किंवा पुस्तक प्रदर्शनांवर अवलंबून राहण्याची गरज मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

Book
Sinhgad Education Society Salary Case: सिंहगड एज्युकेशन सोसायटीतील २७ शिक्षकांच्या वेतन अपहारप्रकरणी मारुती नवलेसह सात जणांवर गुन्हा

भारतीय टपाल विभागाकडून घरपोच वितरण

या योजनेच्या पहिल्या टप्प्यात मुंबई येथील शासकीय ग्रंथालयातून ऑनलाइन विक्री सुरू करण्यात येणार आहे. पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील शासकीय ग्रंथालयांमध्ये काऊंटर विक्री आणि प्रदर्शन विक्रीचे व्यवस्थापनही याच प्रणालीद्वारे केले जाणार आहे. ऑनलाइन खरेदी केलेली पुस्तके भारतीय टपाल विभागामार्फत वाचकांच्या घरी पोहोचवली जातील. पुस्तकांचे वजन आणि वितरणाच्या अंतरानुसार टपाल शुल्क आकारले जाणार आहे.

२४ तास कार्यरत ऑनलाइन सेवा

ऑनलाइन विक्री प्रक्रिया सुरळीत राहावी, यासाठी महाआयटीमार्फत २४ तास कार्यरत राहणारे दोन संगणक चालक नियुक्त करण्यात येणार आहेत. वाचकांना डिजिटल पेमेंटची सुविधा उपलब्ध असेल. तसेच पुस्तकांचे सुरक्षित पॅकिंग करून वितरणाची संपूर्ण प्रक्रिया कार्यक्षम पद्धतीने राबविण्यात येणार आहे. संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या सर्व शासकीय पुस्तकांची सविस्तर यादीही वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news