Pune University Chowk Double Decker Flyover: पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाचे आज लोकार्पण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन; बाणेर-पाषाण मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्याची अपेक्षा
Pune University Chowk Double Decker Flyover
Pune University Chowk Double Decker FlyoverPudhari
Published on
Updated on

पुणे: पुणे विद्यापीठ चौकातील बहुप्रतीक्षित एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण आज रविवारी (दि. 8) सकाळी 10 वाजता होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुलाचे ऑनलाइन उद्घाटन करण्यात येणार आहे. या उड्डाणपुलामुळे विद्यापीठ रस्ता, पाषाण आणि बाणेर परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कमी होऊन वाहनचालकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Pune University Chowk Double Decker Flyover
Pune Bharat Mandapam: लोहगावमध्ये ‘भारत मंडपम’ प्रकल्पाला गती; आरक्षण बदलाचा अहवाल राज्याकडे

हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पूर्ण केला असून, शहरातील वाहतूक व्यवस्थेला गती देण्यासाठी हा पूल महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. या उद्घाटन सोहळ्यास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री व पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

Pune University Chowk Double Decker Flyover
Maharashtra Farmer Loan Waiver: दोन लाखांच्या कर्जमाफीवर शेतकरी संघटना संतप्त; ‘सातबारा कोरा’चे आश्वासन कुठे गेले?

याशिवाय विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि पुण्याच्या महापौर मंजूषा नागपुरे यांची उपस्थिती राहणार आहे.

Pune University Chowk Double Decker Flyover
Pune Chhatrapati Sambhajinagar Highway: पुणे-संभाजीनगर ग्रीनफिल्ड महामार्गाला मंजुरी; 8 तासांचा प्रवास आता फक्त 4 तासांत

तसेच खा. मेधा कुलकर्णी, खा. सुप्रिया सुळे, खा. श्रीरंग बारणे, खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्यासह जिल्ह्यातील विधानपरिषद व विधानसभा सदस्यही या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

Pune University Chowk Double Decker Flyover
Pune Global Capability Centers GCC: 400 नवीन जीसीसी केंद्रांची घोषणा; आयटी आणि रोजगाराला चालना

प्रवासाचा वेळ होणार कमी

पुण्यातील सर्वाधिक वर्दळीच्या चौकांपैकी एक असलेल्या विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी लक्षात घेऊन या एकात्मिक दुमजली (डबलडेकर) उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली आहे. मेट्रो मार्गिका आणि उड्डाणपूल अशा एकत्रित रचनेमुळे सिग्नलवरील ताण कमी होऊन वाहनचालकांचा प्रवास अधिक जलद आणि सुलभ होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news