Government Technical Schools Renaming: राज्यातील ५१ शासकीय तंत्रनिकेतनांचे नामांतर; पुण्यातील संस्थांनाही नवी नावे!

पुण्यातील संस्थांना आता हिरोजी इंदुलकर आणि जेजुरीतील संस्थेला दत्तोपंत मसकर यांचे नाव; शासनाची मंजुरी
Government Technical Schools
Government Technical SchoolsPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: राज्यातील शासकीय तंत्रनिकेतनांच्या नामांतराची प्रक्रिया पुढे सरकली असून, कोकण आणि नाशिक विभाग वगळता अन्य विभागांतील आणखी ५१ शासकीय तंत्रनिकेतन संस्थांची नावे बदलण्यास शासनाने मान्यता दिली आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाने यासंदर्भातील निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांमधील तंत्र शिक्षण संस्थांना नवीन नावे मिळणार आहेत.

Government Technical Schools
Mahatma Phule Memorial Expansion: महात्मा फुले स्मारकाच्या विस्ताराला गती! ३०० कोटींचा निधी मंजूर; भूसंपादनाचा मार्ग मोकळा

या नावांमध्ये विविध क्षेत्रांतील सामाजिक कार्यकर्ते, विशिष्ट विचारांना वाहिलेले समाजसेवक आणि स्वातंत्र्यसेनानी यांचा समावेश आहे. कौशल्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एकसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीला शासकीय तांत्रिक विद्यालयांच्या नामांतराबाबत निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. या प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात कोकण आणि नाशिक विभागातील २५ शासकीय तांत्रिक विद्यालयांची नावे बदलण्यास दि. २१ ऑक्टोबर २०२६ रोजी शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली होती. आता राज्यातील अन्य विभागांमधील ५१ संस्थांच्या नामांतरास मंजुरी मिळाली आहे.

Government Technical Schools
Morgaon Mayureshwar Maha Snan: सोमवती अमावास्येला मोरगावच्या मयूरेश्वराला कऱ्हा नदीत महास्नान; तोफांची ऐतिहासिक सलामी

नव्या निर्णयानुसार यवतमाळ जिल्ह्यातील सर्वाधिक पाच शासकीय संस्थांची नावे बदलण्यात येणार आहेत. छत्रपती संभाजीनगर आणि वर्धा या जिल्ह्यांतील प्रत्येकी चार संस्थांचा समावेश आहे. नांदेड, अमरावती आणि गडचिरोली जिल्ह्यांतील प्रत्येकी तीन संस्थांची नावे बदलली जाणार आहेत. पुणे, सातारा, जालना, परभणी, बीड, हिंगोली, धाराशिव, वाशिम, नागपूर, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांतील प्रत्येकी दोन संस्थांचे नामांतर होणार आहे.

Government Technical Schools
Payal Zambare Case: पायल झांबरे प्रकरणात पतीसह सासू-सासऱ्यांच्या कोठडीत वाढ; ३५ तोळे सोने जप्त

सांगली, सोलापूर, लातूर, बुलडाणा आणि भंडारा या जिल्ह्यांतील प्रत्येकी एका संस्थेचे नाव बदलण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले. माध्यमिक स्तरापासूनच विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षणाची आवड निर्माण व्हावी आणि रोजगाराभिमुख कौशल्यांचा विकास व्हावा, हा या अभ्यासक्रमांचा मुख्य उद्देश आहे. नामांतराच्या निर्णयामुळे या तंत्र शिक्षण संस्थांना नवी ओळख मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Government Technical Schools
Pune Metro Miniature Model: टाकाऊ साहित्यापासून साकारली पुणे मेट्रोची प्रतिकृती; मुख्यमंत्री फडणवीस यांना अनोखी भेट

पुण्यातील दोन संस्था

शासकीय तांत्रिक विद्यालय पुणे या संस्थेचे नाव आता हिरोजी इंदुलकर शासकीय तांत्रिक विद्यालय पुणे तसेच शासकीय तांत्रिक विद्यालय केंद्र जेजुरी या संस्थेचे नाव आता दत्तोपंत मसकर शासकीय तांत्रिक विद्यालय जेजुरी असे करण्यात आले आहे. त्यामुळे पुण्यात दोन संस्थांचे नामांतर करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.