Morgaon Mayureshwar Maha Snan: सोमवती अमावास्येला मोरगावच्या मयूरेश्वराला कऱ्हा नदीत महास्नान; तोफांची ऐतिहासिक सलामी

सिंहस्थ पर्वकाळात पार पडला धार्मिक विधी; पालखी सोहळा, महाआरती आणि राजेशाही मिरवणुकीने भक्तिमय वातावरण
Morgaon Mayureshwar Maha Snan
Morgaon Mayureshwar Maha SnanPudhari
Published on: 
Updated on: 

मोरगाव: सोमवती अमावास्येनिमित्त मोरगाव (ता. बारामती) येथील श्री मयूरेश्वराच्या मूर्तीस कऱ्हा नदीतील ऊर्ध्वजल अर्थात आध्यात्मिक आणि धार्मिकदृष्ट्या विशेष महास्नान घालण्यात आले. महास्नानाकरिता मूर्तीला मिरवणुकीद्वारे नदीतीरी आणण्यात आले. या वेळी ऐतिहासिक तोफांची सलामी देण्यात आली.

Morgaon Mayureshwar Maha Snan
Payal Zambare Case: पायल झांबरे प्रकरणात पतीसह सासू-सासऱ्यांच्या कोठडीत वाढ; ३५ तोळे सोने जप्त

मयूरेश्वराच्या मूर्तीला ऊर्ध्वजलासाठी सोमवती अमावास्येला सिंहस्थ पर्वकाळ मानण्यात येतो. सोमवारी (दि. ९) सकाळी ८.३० वाजता श्री मयूरेश्वर प्रभूंच्या राजेशाही स्वारीचे सर्व लव्याजम्यासह पर्वकाळ महास्नानासाठी श्री कऱ्हातीरी श्री गणेशकुंड येथे प्रस्थान झाले. तत्पूर्वी, गाभाऱ्यातून मूर्ती पालखीत ठेवल्यानंतर राजेशाही, अबदागिरी, छत्र्या, सनईच्या निनादात पालखीने मंदिराला प्रदक्षिणा घातली.

Morgaon Mayureshwar Maha Snan
Pune Metro Miniature Model: टाकाऊ साहित्यापासून साकारली पुणे मेट्रोची प्रतिकृती; मुख्यमंत्री फडणवीस यांना अनोखी भेट

बाजारपेठेतून नगारे आणि चौघड्यासह कऱ्हा नदीतील गणेशकुंडावर पालखी सोहळा पोहचला. पालखीसमोर आतषबाजी करून तोफांची सलामी देण्यात आली. गणेशकुंडावर मंत्रोच्चारात मूर्ती प्रथेप्रमाणे गावातील सोनाराकडे देण्यात आली. सोनाराकडून श्री मयूरेश्वराच्या मूर्तीस उटणे लावून ऊर्ध्वजल अर्थात स्नान घालण्यात आले.

Morgaon Mayureshwar Maha Snan
Pune Cantonment Board Land Development: पुणे कॅन्टोन्मेंटचा उत्पन्नवाढीसाठी 'मास्टर प्लॅन'! कोरेगाव पार्कसह तीन मोक्याच्या जागा व्यावसायिक वापरासाठी

त्यानंतर ग्रामस्थांनी प्रथेनुसार मयूरेश्वराची मूर्ती डोक्यावर घेऊन अंघोळ केली. सिंहस्थ पर्वकाळ महास्नान झाल्यानंतर राजेशाही स्वारी निघताना श्री कऱ्हामाईची गुरव मंडळींकडून महाआरती झाली. सध्या दीपावली असल्याने तसेच पवित्र कार्तिक स्नानपर्व हा दुर्मीळ महायोग असल्याने मोरगावातील ग्रामस्थ, महिला भगिनी गणेशभक्त यांनी श्री कऱ्हामाईच्या महाआरतीस एक तुपाचा दिवा प्रज्वलित करून आरती झाल्यानंतर श्री गणेशकुंडात प्रवाहित करण्यात आले. याचा लाभ अनेक गणेश भक्तांनी घेतला.

Morgaon Mayureshwar Maha Snan
PMPML Dash Camera System: पीएमपीच्या नव्या १ हजार सीएनजी बसमध्ये डॅश कॅमेरे! अपघातांचे कारण शोधणे होणार सोपे

ऊर्ध्वजल स्नानानंतर श्री मयूरेश्वराची मूर्ती पालखीतून राजेशाही थाटात सनई-चौघड्याच्या मंगलमय वातावरणात फटाक्यांच्या व तोफांच्या आतषबाजीत मंदिराकडे आणण्यात आली. मंदिराकडे मार्गस्थ होताना पालखी सोहळ्यात ग्रामस्थांनी रेवडी, खोबरे, शेंगदाणे इत्यादीची उधळण केली. पालखी सोहळा मंदिरात पोहचल्यानंतर मयूरेश्वराच्या मूर्तीची मंत्रोच्चारात पूजा करण्यात आली. त्यानंतर मूर्ती पुन्हा गाभाऱ्यात स्थानापन्न करण्यात आली. या वेळी रत्नजडीत अलंकाराचा राजेशाही पोशाख चढविण्यात आला. या वेळी सर्व भाविक उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.