Traditional Diwali Brooms: दिवाळीसाठी लोणी-धामणीत पारंपरिक केरसुण्यांची लगबग; २० हजार झाडूंची निर्मिती

शिंदीच्या झावळ्यांपासून केरसुण्या तयार करण्याचा पारंपरिक व्यवसाय संकटात; प्लास्टिकच्या झाडूंचा वाढता वापर आणि कच्च्या मालाच्या टंचाईचे आव्हान
Traditional Brooms
Traditional BroomsPudhari
Published on: 
Updated on: 

लोणी-धामणी: दिवाळी सण जवळ येताच घराघरांत स्वच्छतेची लगबग सुरू झाली आहे. लक्ष्मीपूजनासाठी मानाचे स्थान असलेल्या पारंपरिक लक्ष्मी अर्थात केरसुणी तयार करण्याच्या कामाला आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लोणी आणि धामणी परिसरात वेग आला आहे. शिंदीच्या झावळ्यांपासून पारंपरिक पद्धतीने केरसुण्या तयार करण्याचा व्यवसाय आजही अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा आधार ठरत आहे.

Traditional Brooms
Rahu DJ Noise Case: राहूत डीजेच्या कर्णकर्कश आवाजात गोंधळ; ३८ जणांवर यवत पोलिसांकडून गुन्हा दाखल

लोणी येथील पंचरास वाड्यात दरवर्षी सुमारे १५ ते २० हजार केरसुण्या तयार केल्या जातात. खेड, शिरूर, मंचर, घोडेगाव, नारायणगाव, चाकण, पिंपरी-चिंचवड, भोसरी तसेच पुणे शहरातील विविध बाजारपेठांमध्ये या केरसुण्या विक्रीसाठी पाठवल्या जातात. धामणी परिसरातील काही कुटुंबेही या पारंपरिक व्यवसायात कार्यरत आहेत.

Traditional Brooms
Pune Property Tax Self Assessment: पुण्यात मिळकतकरासाठी ‘सेल्फ असेसमेंट’ प्रणाली आणा; विरोधी पक्षनेते नीलेश निकम यांची मागणी

शिंदीच्या पानांपासून आणि झावळ्यांपासून केरसुण्या तयार केल्या जातात. मात्र, गेल्या काही वर्षांत प्लास्टिकच्या झाडूंचा वापर वाढल्याने पारंपरिक केरसुण्यांच्या मागणीत घट झाली आहे. त्यातच शिंदीच्या झाडांची संख्या कमी झाल्याने कच्चा माल मिळवणेही कठीण झाले आहे. त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेल्या कुटुंबांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.

Traditional Brooms
Pune Cyber Fraud: तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने महिलेला २६.३० लाखांचा गंडा; ऑपरेशनसाठी मदतीचे आमिष

दिवाळीच्या दोन ते तीन महिने आधी केरसुण्या तयार करण्याच्या कामाला सुरुवात केली जाते. यंदा पावसाला झालेल्या विलंबामुळे काम उशिरा सुरू झाले. मात्र, दिवाळी जवळ आल्याने कामाला वेग आला आहे, असे लोणी येथील व्यावसायिक सुभाष पंचरास, संगिता पंचरास, अरुणा पंचरास आणि संतोष पवार यांनी सांगितले.

Traditional Brooms
Pune Water Cut: पुण्यातील पाणीकपात २० टक्क्यांपर्यंत वाढवू नका; १३ टक्के कपात पुरेशी असल्याचा दावा

एक व्यक्ती दिवसाला साधारण ४० ते ५० केरसुण्या तयार करू शकते, तर प्रत्येक कुटुंबाकडून दिवसाला ५०० ते १,००० केरसुण्यांची निर्मिती केली जाते. साधारण ३० ते ४० रुपयांना विकली जाणारी एक केरसुणी दिवाळीच्या काळात ५० ते ७० रुपयांना विकली जाते, अशी माहिती संतोष पंचरास यांनी दिली.

पारंपरिक व्यवसायाला प्रोत्साहनाची गरज

प्लास्टिकच्या झाडूंचा वाढता वापर, शिंदीच्या झाडांची घटती संख्या आणि कच्च्या मालाची कमतरता यामुळे पारंपरिक केरसुणी बनविणाऱ्या कारागिरांसमोर अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. दिवाळीच्या काळात मागणी वाढत असली, तरी वर्षभर रोजगाराची हमी मिळत नाही. त्यामुळे या पारंपरिक व्यवसायाला प्रोत्साहन देऊन स्थानिक कारागिरांना आर्थिक आधार देण्याबरोबरच पारंपरिक हस्तकला जतन करण्याची गरज व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news