Pune Water Cut: पुण्यातील पाणीकपात २० टक्क्यांपर्यंत वाढवू नका; १३ टक्के कपात पुरेशी असल्याचा दावा

खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठ्याचे गणित मांडत सजग नागरिक मंचाची भूमिका; समान पाणीपुरवठा योजनेवर श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याची मागणी
Water Supply
Water SupplyPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: शहरात सध्या सुरू असलेली १३ टक्के पाणीकपात पुरेशी असून, ती वाढवून २० टक्के करण्याची आवश्यकता नाही, असा दावा सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केला आहे. खडकवासला धरणसाखळीतील उपलब्ध पाणीसाठा आणि शहराची आगामी महिन्यांतील गरज यांची आकडेवारी मांडत त्यांनी कपात वाढविण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे.

Water Supply
Indapur Guava Prices: पेरूचे भाव घसरले; इंदापूरच्या शेतकऱ्यांना दुहेरी फटका, उत्पादनातही घट

यासंदर्भात २८ ऑक्टोबरला जलसंपदा विभाग आणि सर्व राजकीय पक्षांची बैठक होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी २० टक्के कपातीची सूचना केल्याच्या पार्श्वभूमीवर मंचाने आपली भूमिका मांडली आहे. मंचाच्या म्हणण्यानुसार, १५ ऑक्टोबरला खडकवासला धरणसाखळीत २५.६६ टीएमसी पाणीसाठा होता. कपात नसल्यास महापालिकेला दरमहा १.६ टीएमसी पाणी लागते.

Water Supply
Purandar Drought Relief: पुरंदर तालुक्यात दुष्काळाचा ४३ हजार शेतकऱ्यांना फटका; ३४.८५ कोटींच्या मदतीची प्रतीक्षा

१५ ऑक्टोबर २०२६ ते ३१ ऑगस्ट २०२७ या कालावधीत शहराची गरज १७.४० टीएमसी असेल. दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवल्याने सुमारे १३ टक्के बचत होऊन ही गरज १५ टीएमसीपर्यंत कमी होऊ शकते. पुण्यासाठी १५ टीएमसी पाणी राखीव ठेवल्यानंतर धरणसाखळीत १०.६६ टीएमसी शिल्लक राहील.

Water Supply
Gangadham Chowk Drainage Pit: येरवडा दुर्घटनेतूनही घेतला नाही धडा! गंगाधाम चौकात ड्रेनेजच्या खड्ड्याभोवती सुरक्षेचा अभाव

त्यातील तीन टीएमसी बाष्पीभवन गृहीत धरले, तरी सिंचनासाठी आणि दौंड- इंदापूर परिसरातील तलाव भरण्यासाठी ७.६६ टीएमसी पाणी उपलब्ध राहू शकते. रब्बी हंगाम, पुढील आवर्तने आणि आषाढी वारीसाठीही नियोजन करता येईल.

Water Supply
Pune Diwali Diyas: पुण्यात दिवाळीच्या पणत्यांची बाजारपेठ सजली; कमळ, मोर, वृंदावनासह वॉल हॅगिंग दिव्यांना पसंती

मुंढवा जॅकवेलमधून बेबी कालव्याद्वारे शेतीसाठी सुमारे पाच टीएमसी पाणी देणे शक्य असल्याचे वेलणकर यांनी नमूद केले. त्यामुळे ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत सध्याची कपात कायम ठेवावी, अशी मागणी मंचाने केली आहे. तसेच, पाणीगळती कमी करणे आणि समान पाणीपुरवठ्यासाठी गेल्या पाच वर्षांत दोन हजार कोटी रुपये खर्चून उभारलेल्या समान पाणीपुरवठा योजनेतून काय साध्य झाले, याची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याची मागणीही वेलणकर यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news