Rahu DJ Noise Case: राहूत डीजेच्या कर्णकर्कश आवाजात गोंधळ; ३८ जणांवर यवत पोलिसांकडून गुन्हा दाखल

पोलिसांच्या वारंवार सूचनांकडे दुर्लक्ष; ध्वनिप्रदूषण आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा
DJ Noise Case
DJ Noise CasePudhari
Published on: 
Updated on: 

राहू: राहू (ता. दौंड) येथील थोरली विहीर परिसरात रविवारी (दि. २५) रात्री ९.३० वाजता डीजे साउंड सिस्टिमवर कर्णकर्कश आवाजात गाणी वाजवत आरडाओरड आणि गोंधळ घातल्याचा प्रकार घडला. यवत पोलिसांनी गोंधळ थांबविण्याच्या वारंवार सूचना देऊनही संबंधितांनी उपद्रव सुरूच ठेवल्याने पोलिसांनी ३८ जणांवर गुन्हा दाखल केला.

DJ Noise Case
Pune Property Tax Self Assessment: पुण्यात मिळकतकरासाठी ‘सेल्फ असेसमेंट’ प्रणाली आणा; विरोधी पक्षनेते नीलेश निकम यांची मागणी

याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल कृष्णा पांडुरंग महात्मे नेमणूक यांनी फिर्याद दिली. त्यानुसार समाधान ईश्वर गाढवे, आप्पा जगदाळे, संग्राम सोनवणे, विजय कुंभार, आदित्य शिंदे, सार्थक चव्हाण, ओम सोनवणे, शंभू रामभाऊ कुल, भाऊ गाढवे (सर्व रा. राहू, ता. दौंड), अथर्व पुणेकर (रा. मांजरी, ता. हवेली), कृष्णा कोळपे व मनोज लोनकर (रा. केडगाव, ता. दौंड) तसेच महेश तायगुडे (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) आणि इतर २५ अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

DJ Noise Case
Pune Cyber Fraud: तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने महिलेला २६.३० लाखांचा गंडा; ऑपरेशनसाठी मदतीचे आमिष

या प्रकरणाचा तपास सहाय्यक फौजदार संतोष कदम करीत आहेत. सार्वजनिक ठिकाणी नियमांचे उल्लंघन करून ध्वनिप्रदूषण, आरडाओरड किंवा कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news