Mumbai Pune Expressway Mega Block: लोणावळा एक्स्प्रेस वेवर ट्रॅफिक ब्लॉक; डोंगरगाव-कुसगाव उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात

मुंबई-पुणे वाहतूक काही तासांसाठी बंद; मिसिंग लिंक प्रकल्पामुळे जुन्या महामार्गावर वळविण्यात येणार वाहने
Mumbai Pune Expressway Traffic
Mumbai Pune Expressway TrafficPudhari
Published on
Updated on

लोणावळा: पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवरील डोंगरगाव-कुसगाव परिसरात सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. या पुलाच्या कामासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून दोन दिवसांचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आला आहे. आज गुरुवारी दुपारी 12 ते 3 या वेळेत मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती, तर उद्या (शुक्रवारी) याच वेळेत पुण्याकडे जाणारी वाहतूक थांबवली जाणार आहे.

Mumbai Pune Expressway Traffic
Maharashtra Women Property Registration: राज्यात महिलांच्या घरनोंदणीत मोठी वाढ; पुणे आघाडीवर, 564 कोटींची मुद्रांक शुल्क बचत

पुलाचे काम आणि मिसिंग लिंकचा टप्पा

एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या मिसिंग लिंक प्रकल्पाची सुरुवात ज्या ठिकाणाहून होते, तिथेच हा उड्डाणपूल उभारला जात आहे. सध्या या पुलाचे शटरिंग काढणे आणि रंगकामाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे.

Mumbai Pune Expressway Traffic
Pune Property Tax Women Discount: पुण्यात महिलांच्या नावावरील घरांना 50% मिळकत कर सवलत; स्थायी समितीची मंजुरी

मिसिंग लिंकचे कामही शेवटच्या टप्प्यात असून, हा उड्डाणपूल पूर्ण होणे त्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. वाहतुकीचे नियोजन आणि अंमलबजावणी प्रशासनाने दिलेल्या नियोजनानुसार, गुरुवारी मुंबईकडे जाणारी वाहतूक दुपारी 12 वाजता बंद होणे अपेक्षित होते. मात्र, तांत्रिक कारणास्तव आणि पूर्वतयारीसाठी सकाळी 11 वाजल्यापासूनच वाहने थांबवण्यास सुरुवात करण्यात आली. यामुळे प्रवासाचे नियोजन करून निघालेल्या अनेक वाहनचालकांना काही काळ खोळंबून राहावे लागले.

Mumbai Pune Expressway Traffic
Pune Hoarding Policy Controversy: पुणे महापालिकेच्या होर्डिंग धोरणावरून भाजपमध्ये अंतर्गत कलह; धोरणच रद्द

ब्लॉकचे वेळापत्रक: शुक्रवार:

पुण्याकडे जाणारी वाहतूक (दुपारी 12 ते 3) - बंद राहणार. साधारणपणे एक्स्प्रेस वेवर ब्लॉक असल्यास सर्व वाहतूक जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वळवली जाते, ज्यामुळे मावळ परिसरात मोठी वाहतूक कोंडी होते. मात्र, आज प्रशासनाने आधीच आवाहन केल्याने अनेक नागरिकांनी या वेळेत प्रवास टाळला.

Mumbai Pune Expressway Traffic
Family Property Dispute: शिरूरमध्ये मालमत्तेवरून वाढते कौटुंबिक वाद; नाती कोर्टात ताणली जातायत

परिणामी, जुन्या महामार्गावर वाहनांची संख्या मर्यादित राहून वाहतूक सुरळीत सुरू असल्याचे पाहायला मिळाले. शुक्रवारी दुपारी 12 ते 3 या वेळेत पुण्याकडे येणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा किंवा शक्य असल्यास ब्लॉकची वेळ टाळून आपला प्रवास निश्चित करावा, जेणेकरून गैरसोय होणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news