Maharashtra Women Property Registration: राज्यात महिलांच्या घरनोंदणीत मोठी वाढ; पुणे आघाडीवर, 564 कोटींची मुद्रांक शुल्क बचत

स्टॅम्प ड्युटीमध्ये 1 टक्का सवलतीचा परिणाम; 74 हजारांहून अधिक महिलांनी घेतले घर, अटी शिथिल झाल्यानंतर नोंदणीत झपाट्याने वाढ
House
HousePudhari
Published on
Updated on

पुणे: महिला घराची मालकीण बनावी, यासाठी राज्य सरकारने घर खरेदी करताना मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलत दिली आहे. त्यातच या योजनेतील विक्रीची अट काढून टाकल्यानंतर गेल्या तीन वर्षांत महिलांच्या नावावर खरेदीत मोठी वाढ होत आहे. गेल्या आर्थिक वर्षात (2025-26) राज्यातील 74 हजार 211 महिलांच्या नावे घर खरेदी करण्यात आली असून, यातून 564 कोटी 96 लाख रुपयांची बचत झाली आहे. त्यातही पुणे शहरातील महिलांचा सिंहाचा वाटा असून, 21 हजार 894 जणींना स्वत:च्या नावे घर करता आले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत (55 हजार 234) या आर्थिक वर्षात तब्बल 20 हजार घरे महिलांच्या नावावर अधिक झाले आहेत.

House
Pune Property Tax Women Discount: पुण्यात महिलांच्या नावावरील घरांना 50% मिळकत कर सवलत; स्थायी समितीची मंजुरी

सदनिकेचा खरेदी व्यवहार करताना मुंबई-पुणे यासारख्या शहरांत दस्तनोंदणीवर सात टक्के मुद्रांक शुल्क आकारले जाते. महिलांच्या नावे सदनिका खरेदी केल्यास एक टक्का सवलत मिळत असल्याने सहा टक्के मुद्रांक शुल्क भरावे लागते. सुरुवातीला या योजनेत महिलांच्या नावे घर खरेदी केल्यास संबंधित महिला ते 15 वर्षे विकू शकत नव्हती. असे घर विकल्यास संबंधित महिलेला 1 टक्का मुद्रांक शुल्क व दंड वसूल करण्याची तरतूद करण्यात आली होती. मात्र, या अटीमुळे घर खरेदीला हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी राज्य सरकारने ही अट काढून टाकली आहे. त्यामुळे या नोंदणीत मोठा प्रतिसाद वाढल्याची माहिती राज्याचे नोंदणी उपमहानिरीक्षक अभयसिंह मोहिते यांनी दिली

House
Pune Hoarding Policy Controversy: पुणे महापालिकेच्या होर्डिंग धोरणावरून भाजपमध्ये अंतर्गत कलह; धोरणच रद्द

राज्यात 2022-23 या आर्थिक वर्षात 11 हजार 66 महिलांच्या नावे घर खरेदी झाली होती. त्यातून 72 कोटी 83 लाख रुपयांची बचत झाली होती. या योजनेतील विक्रीची अट काढून टाकल्यानंतर 2023-24 आर्थिक वर्षात राज्यातील 28 हजार 951 हजार महिलांच्या नावे घर खरेदी करण्यात आली असून, यातून 201 कोटी रुपयांची बचत झाली आहे, तर 2024-25 ही संख्या सुमारे दुप्पट वाढली असून, एकूण 55 हजार 234 महिलांनी याचा लाभ घेतला आहे. त्यातून या महिलांना 389 कोटी 80 लाख रुपयांची सवलत मिळाली आहे. तर, यंदाच्या आर्थिक वर्षात 74 हजार 211 जणींनी आपल्या नावे घर खरेदी केली असून, त्यातून 564 कोटी 96 लाख रुपयांची बचत केली आहे.

House
Family Property Dispute: शिरूरमध्ये मालमत्तेवरून वाढते कौटुंबिक वाद; नाती कोर्टात ताणली जातायत

राज्यातील महिलांच्या नावे घरनोंदणी

अहिल्यानगर - 369, अकोला - 195, अमरावती - 197, छत्रपती संभाजीनगर - 1119, बीड - 47, बुलडाणा -30, चंद्रपूर - 26, धुळे - 211, गडचिरोली - 10, गोंदिया - 4, हिंगोली - 14, जळगाव - 471, जालना -65, मुंबई जिल्हा - 6270, ठाणे - 10978, कोल्हापूर - 727, लातूर - 416, मुंबई उपनगर - 9429, नागपूर शहर - 2387, नागपूर ग््राामीण - 59, नांदेड 273, नंदुरबार - 79, नाशिक - 2595, धाराशिव - 13, पालघर - 3776, परभणी - 51, पुणे -21894, पुणे ग््राामीण - 1591, रायगड - 4299, रत्नागिरी -194, सांगली - 682, सातारा - 1028, सिंधुदुर्ग - 259, सोलापूर - 688, ठाणे ग््राामीण - 3468, वाशिम - 42, वर्धा - 57, यवतमाळ - 196, एकूण - 74211, वाचलेले मुद्रांक शुल्क - 564 कोटी 96 लाख 3 हजार 262

House
Daund Illegal Weapons Arrest: दौंडमध्ये देशी कट्ट्यासह तरुणाला अटक; पोलिसांची धडक कारवाई

या योजनेचा प्रसार करण्यासाठी शहरपातळीवर मोठे प्रयत्न केल्यामुळे राज्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तसेच, राज्याला असलेल्या प्रागतिक वारशातही अनेकांनी घरातील महिलांच्या नावे घर खरेदी केले आहे.

अभयसिंह मोहिते, नोंदणी उपमहानिरीक्षक, पुणे

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news