Pune Hoarding Policy Controversy: पुणे महापालिकेच्या होर्डिंग धोरणावरून भाजपमध्ये अंतर्गत कलह; धोरणच रद्द

बिडकरांची घोषणा, भिमाले अनभिज्ञ; कोअर कमिटीतही निर्णयावरून गोंधळाची स्थिती
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationPudhari
Published on
Updated on

पुणे: महापालिकेच्या जागांवर होर्डिंगला परवानगी देण्याच्या नव्या जाहिरात धोरणावरून स्थायी समिती अध्यक्ष आणि प्रशासनात झालेल्या संघर्षानंतर अखेर हे धोरणच रद्द करण्याची घोषणा सभागृह नेते गणेश बिडकर यांनी केली. स्थायी समिती अध्यक्ष भिमाले यांनी मात्र याबाबत अनभिज्ञ असल्याचे सांगितले. त्यामुळे जाहिरात धोरणावरून सत्ताधारी भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे.

Pune Municipal Corporation
Family Property Dispute: शिरूरमध्ये मालमत्तेवरून वाढते कौटुंबिक वाद; नाती कोर्टात ताणली जातायत

महापालिकेच्या जागांवर जाहिरात धोरणासाठी प्रशासनाने अटी घातल्यानंतर संतापलेल्या स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी अतिरिक्त आयुक्तांना आयुक्तांसमोरच दमबाजी केल्याची चर्चा रंगली होती. हे प्रकरण थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचल्याने त्यांनी शहर पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. त्यानंतर सभागृह नेते बिडकर यांनी पत्रकार परिषदेत हे धोरण रद्द केल्याची घोषणा केली. मात्र, या पत्रकार परिषदेला महापालिकेत असूनही स्थायी समिती अध्यक्ष भिमाले अनुपस्थित होते.

Pune Municipal Corporation
Daund Illegal Weapons Arrest: दौंडमध्ये देशी कट्ट्यासह तरुणाला अटक; पोलिसांची धडक कारवाई

बिडकर यांच्या पत्रकार परिषदेनंतर भिमाले यांनी स्थायी समितीच्या निर्णयांची माहिती घेण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. त्यांना जाहिरात धोरण रद्दच्या निर्णयाबाबत विचारणा केली असता, त्यांनी अनभिज्ञता व्यक्त केली.‌ ‘हा निर्णय कधी झाला, कोणी घेतला, याची माहिती नाही,‌’ म्हणत या प्रकरणापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पालिकेत भाजप पदाधिकाऱ्यांत समन्वयाचा अभाव असल्याची चर्चा सुरू झाली.

Pune Municipal Corporation
Pune Growth Hub Development: पुणे ठरणार जागतिक ‘ग्लोबल ग्रोथ हब’; पीएमआर विकास आराखडा तयार करण्यास सुरुवात

काय म्हणाले बिडकर?

बिडकर म्हणाले, हा प्रस्ताव प्रशासनाकडून ठेवण्यात आला होता. स्थायी समिती अध्यक्षांचा त्यात कोणताही सहभाग नव्हता. महापालिकेचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेता शहराच्या कोअर कमिटीत चर्चा होऊन हे धोरण शहरहिताचे नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. त्यानुसार ते रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, गटनेता म्हणून संबंधितांना याची माहिती देण्यात आली आहे.

Pune Municipal Corporation
Pune Municipal Schools Upgrade: पुणे महापालिकेच्या 75 शाळांचा ‘आदर्श शाळा’ विकास; 3.14 कोटींच्या खरेदीला मंजुरी

कोअर कमिटीत भिमालेही!

विशेष म्हणजे, भाजपच्या शहर कोअर कमिटीत भिमाले हे सदस्य आहेत. तरीही त्यांनी या निर्णयाबाबत अनभिज्ञता व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात प्रश्न उपस्थित होत आहेत. कोअर कमिटीत निर्णय झाला असेल तर भिमाले यांना वगळून बैठक झाली का, अशीही चर्चा रंगली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news