Pune News : म्हशींच्या पारडीवर बिबट्याचा हल्ला

Pune News : म्हशींच्या पारडीवर बिबट्याचा हल्ला
Published on
Updated on

ओतूर : पुढारी वृत्तसेवा : मंगळवारी (दि. ३१) मध्यरात्री घराजवळील म्हशींच्या बंदिस्त गोठ्यात खिडकीतून प्रवेश करीत बिबट्याने म्हशींच्या १५ दिवसांपूर्वीच जन्मलेल्या दोन पारडींवर हल्ला चढवला. या हल्ल्यात दोन्ही पारडी जाग्यावरच ठार झाल्या. ओतूरच्या (ता. जुन्नर) घुलेपट शिवारातील शेतकरी मधुसूदन जयराम घुले यांच्या मालकीच्या गोठ्यात ही दुर्दैवी घटना घडली. एक म्हैस जाफरा तर दुसरी हरियाणा जातीची असून आपली पिल्लं आपल्या डोळ्यासमोर बिबट्याच्या हल्ल्यात देवाघरी गेल्याने त्या म्हशी आता बेकामी झाल्या आहेत. यामध्ये शेतकऱ्याचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याची चर्चा परिसरात आहे. हे नुकसान भरपाई वनविभागाने द्यावी, अशी संबधीत शेतकऱ्याने मागणी केली आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news