तळेगाव स्टेशन; पुढारी वृत्तसेवा : तळेगाव दाभाडे स्टेशन भागात मंगळवारी (दि.३१)तळेगाव-चाकण महामार्गावरील मराठा क्रांती चौकात मराठा आरक्षण मिळणे बाबत सकल मराठा समाजाच्या वतीने जरांगे-पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी उत्स्फूर्त आंदोलन करण्यात आले. सुरवातीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा जयघोष करत, एक मराठा! लाख मराठा! अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी सत्यशील राजे दाभाडे, गणेश काकडे,अशोक दाभाडे, कल्पेश भगत, आशिष खांडगे, प्रमोद बोराडे, अमोल ढोरे, मिलिंद अच्युत, अनिल वेदपाठक, दिलीप डोळस रेश्मा फडतरे आदींनी मनोगत व्यक्त करून मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीवर ठाम राहण्याचा निर्धार केला. मराठा समाजाचे आंदोलन सुरू असताना अनेक संघटनांनी मराठा आरक्षणास पाठिंबा दर्शविला. या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित होते. यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. दरम्यान पोलीस बंदोबस्त चोख दिसून आला.
हेही वाचा