Junnar Crime: जुन्नरमध्ये खळबळ; विवाहितेचा खून करून आत्महत्येचा बनाव, पती ताब्यात

निमगाव तर्फे माळुंगे येथे धक्कादायक प्रकार; कौटुंबिक वादातून हत्या झाल्याचा संशय, पोलिसांचा तपास सुरू
Murder Case
Murder CasePudhari File Photo
Published on
Updated on

लेण्याद्री: जुन्नर तालुक्यातील निमगाव तर्फे माळुंगे येथे एका विवाहित महिलेचा गळा दाबून खून करून त्यास आत्महत्येचे स्वरूप देण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून जुन्नर पोलिसांनी पतीविरुद्ध खुनाचा गंभीर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

Murder Case
PMPML Diesel Price Hike: डिझेल दरवाढीचा पीएमपीला झटका; महिन्याला 5.40 लाखांचा वाढीव भार

जुन्नर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, रूपाली नवनाथ पारखे (वय ३५, रा. निमगाव तर्फे माळुंगे, ता. जुन्नर) यांचा संशयास्पद मृत्यू शुक्रवारी (दि. १६) दुपारी सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास घडला. या घटनेप्रकरणी मयत महिलेचे भाऊ विकास वसंत पवार (रा. बल्लाळवाडी, ता. जुन्नर) यांनी जुन्नर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Murder Case
Pune Water Cut: मुंढवा जॅकवेलचा अपुरा वापर; पुण्याच्या पाणीकपातीस जलसंपदा विभाग जबाबदार?

फिर्यादीत नमूद केल्यानुसार, रूपाली पारखे यांचे पती नवनाथ बाजीराव पारखे (वय ४३, रा. निमगाव तर्फे माळुंगे) यांनी पत्नीला शेतातील गोठ्यात नेले. त्यानंतर तिचा गळा दाबून खून केला. खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपीने तिच्या गळ्याला दोरी बांधून गोठ्यातील लोखंडी पाइपाला लटकवले आणि तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

Murder Case
Pune Water Crisis: पुण्यात टँकर माफियांची मनमानी; सोसायट्यांवर पाण्यासाठी लाखोंचा बोजा

या घटनेची माहिती समोर आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच जुन्नर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला, तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या प्रकरणी जुन्नर पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची गांभीर्याने दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, पोलीस निरीक्षक किरण अवचर, तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक गटकूळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

Murder Case
Maharashtra Teachers Deputation Order: प्रतिनियुक्तीवरील शिक्षकांना मूळ ठिकाणी परतण्याचे आदेश; मे महिन्याचे वेतन थांबवण्याचा इशारा

पोलिसांनी आरोपी नवनाथ पारखे याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडे सखोल चौकशी सुरू आहे. अद्याप खुनामागील नेमके कारण स्पष्ट झाले नसून कौटुंबिक वादातून ही घटना घडली असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, विवाहितेच्या मृत्यूमुळे तिच्या नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिस तपासानंतर या प्रकरणातील अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news