Pune Road Widening: पुण्यात कागदोपत्री रस्ता रुंदीकरणाला चाप; प्रत्यक्ष रस्ता झाल्याशिवाय एफएसआय-टीडीआर नाही!

महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांचे आदेश; संपूर्ण रस्त्याचे प्रस्तावित रुंदीनुसार प्रत्यक्ष काम पूर्ण करण्याची अट
Road Widening
Road WideningPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: कागदावर रस्ता रुंदीकरण दाखवायचे, त्याच्या मोबदल्यात प्रीमियम एफएसआय आणि टीडीआरचे अतिरिक्त लाभ मिळवायचे आणि प्रत्यक्षात मात्र रस्त्याची रुंदी जैसे थे ठेवायची, अशा प्रकारांना आता चाप बसणार आहे. संपूर्ण रस्त्याचे प्रस्तावित रुंदीनुसार प्रत्यक्ष जागेवर रुंदीकरण झाल्याशिवाय कोणतेही अतिरिक्त लाभ देण्यात येऊ नयेत, असे आदेश महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी दिले आहेत.

Road Widening
Pune Air Show: पुण्याच्या आकाशात सुखोईचा थरार; सूर्यकिरण आणि सारंगच्या हवाई कसरतींनी जिंकली मने!

शहरातील अस्तित्वातील सार्वजनिक रस्त्यांची रुंदी वाढविण्यासाठी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम २१० अन्वये प्रस्ताव तयार केले जातात. स्थायी समिती प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर प्रत्यक्षात रस्ता विकसित न करताच कागदोपत्रीच रुंदीकरण दाखवून बांधकाम नियमामधील तरतुदींनुसार प्रीमियम एफएसआय आणि टीडीआर देऊन बांधकाम प्रस्तावांना मंजुरी दिली जाते.

Road Widening
Warje Water Wastage: पाणीटंचाईच्या काळात वारजेत पाण्याचा अपव्यय; नादुरुस्त स्प्रिंकलरमधून वाहतेय पाणी

परिणामी, कागदोपत्री रुंद झालेल्या रस्त्यांवर प्रत्यक्षात मात्र वाहतुकीचा ताण कायम राहतो. त्याचबरोबर महापालिकेच्या पायाभूत सुविधा आणि नागरी सोयी-सुविधांवरही अतिरिक्त भार पडतो.

Road Widening
Gunjavani Dam Water Storage: गुंजवणी धरणात ८६.६६ टक्के पाणीसाठा; ३ तालुक्यांतील नागरिकांना दिलासा

या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी यापुढे कलम २१० अन्वये रस्ता रुंदीकरण प्रस्तावित केलेल्या रस्त्यांवर नवीन, वाढीव अथवा दुरुस्त बांधकाम प्रस्तावांना अतिरिक्त बांधकाम लाभ देताना प्रत्यक्ष रस्ता रुंदीकरणाची अट पूर्ण करावी लागणार आहे. संबंधित रस्ता प्रस्तावित रुंदीनुसार संपूर्ण लांबीमध्ये प्रत्यक्ष जागेवर विकसित झाल्याशिवाय कोणत्याही स्वरूपाचे अतिरिक्त लाभ देता येणार नाहीत.

Road Widening
Pune Court Security: न्यायालयाची सुरक्षा कडक; पण त्रुटी ‘जैसे थे’

या आदेशाच्या अंमलबजावणीची जबाबदारी शहर अभियंत्यांवर सोपविण्यात आली आहे. दरम्यान, क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी आयुक्तांकडे कागदोपत्री रस्ता रुंदीकरणाकडे लक्ष वेधून त्यावर स्पष्टीकरण मागितले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.