Pune Khadakwasla Car Accident: खडकवासला येथे भीषण अपघात; 4 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू

भरधाव कारने सात वाहनांना धडक दिल्याने मोठी दुर्घटना; 3 ते 4 जण गंभीर जखमी, चालक पोलिसांच्या ताब्यात
Accident
Accidentfile photo
Published on
Updated on

खडकवासला: खडकवासला गावात एका भरधाव कारने सहा दुचाकी आणि एक रिक्षा, अशा एकूण सात वाहनांना धडक दिली. या अपघातात एका 4 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाला असून, 3 ते 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. बेजबाबदार चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास हा अपघात झाला.

Accident
Maharashtra Board Solar Energy Initiative: राज्य मंडळाचा ‘ग्रीन एनर्जी’वर मोठा निर्णय

यशराज नीलेश कांबळे (वय 4, रा. अभिनव कॉलेज रोड, नऱ्हे), असे या अपघातात मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. याप्रकरणी कारचालक अमोल गोरक्षनाथ गेगडे (वय 32, रा. राजापूर, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) आणि त्याचा साथीदार प्रकाश तात्याराम कोठारे (वय 32, रा. होलेवाडी, राजगुरुनगर, ता. खेड) यांनी नांदेड सिटी पोलिसांनी घेतले आहे.

Accident
Lavani Censor Board Demand: लावणी व लोककलांसाठी स्वतंत्र सेन्सॉर बोर्डची मागणी

गेगडे आणि कोठारे हे दोघे कारने खडकवासला धरण भागाकडे चालले होते. ते खडकवासला गावात आले असता गेगडे यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि त्याने रस्त्यावरील सहा दुचाकी आणि रिक्षाला धडक दिली. त्यानंतर कार थेट रस्त्याच्या विरुद्ध बाजूच्या असलेल्या दुकानात घुसली. कारच्या धडकेमुळे दुचाकी आणि रिक्षाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या अपघातात यशराज कांबळे हा चिमुरडा गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला तातडीने सिंहगड रोडवरील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Accident
Pune Hospital Biomedical Waste: कमला नेहरू रुग्णालयात कचऱ्याचा ढीग; आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

मात्र, उपचार सुरू असतानाच सायंकाळी पावणेसातच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. अपघातातील जखमीचे नावे कळू शकली नाही. अपघातानंतर पोलिसांनी कारचालक गेगडे आणि त्याचा साथीदार कोठारे यांना ताब्यात घेतले आहे. वैद्यकीय तपासणी करण्यासाठी त्यांना पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले आहे.

Accident
Sugar Control Order: ऊस नियंत्रण आदेश 2026 मध्ये सुधारणा; साखर उद्योगाच्या महत्त्वाच्या मागण्या

घटनेची माहिती मिळताच नांदेड सिटी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन अपघाताचा पंचनामा केला. आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. नांदेड सिटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल भोस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news