Ketan Agrawal Case: केतन अग्रवाल खूनप्रकरणात उज्ज्वल निकम यांची न्यायालयात उपस्थिती; १७ नोव्हेंबरला पुढील सुनावणी

आरोपींच्या जामीन आणि डिस्चार्ज अर्जांवर होणार सुनावणी; सरकार पक्षाकडून पुराव्यांची जंत्री सादर करण्याची भूमिका
Ujjwal Nikam
Ujjwal Nikampudhari photo
Published on: 
Updated on: 

वडगाव मावळ: केतन अग्रवाल खूनप्रकरणाच्या खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम हे वडगाव मावळ येथील न्यायालयात शनिवार (दि. ३१) उपस्थित होते. दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ नोव्हेंबर रोजी ठेवण्यात आली आहे.

Ujjwal Nikam
Medical Dental Admission: वैद्यकीय, दंत अभ्यासक्रमांच्या १३८ रिक्त जागांसाठी विशेष प्रवेश फेरी; २ नोव्हेंबरपर्यंत नोंदणीची संधी

खटल्याच्या पहिल्याच सुनावणीदरम्यान आरोपींच्या वकिलांनी जामीन मिळावा आणि आरोपींना खटल्यातून मुक्त करण्यात यावे, अशी मागणी करणारे अर्ज न्यायालयात दाखल केले. आरोपींच्या वतीने जामीन अर्जासह डिस्चार्ज अर्जही सादर करण्यात आला.

Ujjwal Nikam
Pune Water Quota: पुणेकरांच्या पाणीप्रश्नावरून सर्वपक्षीय संघर्षाची चिन्हे; आठ महिन्यांसाठी केवळ ७.१५ टीएमसी पाणी!

या अर्जांवर सरकार पक्षाची भूमिका स्पष्ट करताना अॅड. उज्ज्वल निकम यांनी न्यायालयाला सांगितले की, सरकार पक्षाचा नेमका खटला काय आहे, आरोपींविरोधात कोणते पुरावे आहेत आणि कोणत्या कागदपत्राच्या आधारे आरोप सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, याची संपूर्ण माहिती न्यायालयासमोर येणे आवश्यक आहे. सरकार पक्षाकडून पुराव्यांची आणि संबंधित कागदपत्रांची जंत्री सादर केल्यानंतरच आरोपींच्या जामीन अर्जावर विचार करणे योग्य ठरेल, अशी भूमिका निकम यांनी मांडली.

Ujjwal Nikam
Pune Crematorium LPG Supply: पुण्यातील सात स्मशानभूमींना वर्षभर एलपीजीचा पुरवठा; १ कोटींच्या खर्चाला मंजुरी!

तिसऱ्या आरोपीला वकील नेमण्याचे न्यायालयाचे निर्देश

या खटल्यातील तिसरा आरोपी रितेश याने अद्याप स्वतःचा वकील नियुक्त केला नव्हता. त्यामुळे न्यायालयाने त्याला पुढील सुनावणीपूर्वी वकील नेमण्याचे स्पष्ट निर्देश दिले. पुढील तारखेपर्यंत वकील नियुक्त न केल्यास न्यायालयाकडूनच त्याला वकील उपलब्ध करून दिला जाईल, असे न्यायालयाने सांगितले. यावर तिसऱ्या आरोपीने आपण स्वतंत्र वकील नियुक्त करणार असल्याचे न्यायालयाला सांगितले. मात्र, न्यायालयाने याप्रकरणी त्याला शेवटची संधी देत पुढील सुनावणीपूर्वी वकील नेमण्याचे निर्देश दिले.

Ujjwal Nikam
Pune School CCTV Project: पुणे महापालिकेच्या शाळांमध्ये सीसीटीव्हीचा पहारा वाढणार; २ कोटींच्या कामाला मंजुरी!

१७ नोव्हेंबरला जामीन, डिस्चार्ज अर्जावर सुनावणी

१७ नोव्हेंबरला सरकार पक्षाकडून युक्तिवाद करण्यात येणार आहे. तसेच आरोपींच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या जामीन अर्ज आणि डिस्चार्ज अर्जावरही सुनावणी होणार आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.