Pune School CCTV Project: पुणे महापालिकेच्या शाळांमध्ये सीसीटीव्हीचा पहारा वाढणार; २ कोटींच्या कामाला मंजुरी!

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अतिरिक्त कॅमेरे, नेटवर्क आणि विद्युत यंत्रणा उभारणार; आठ महिन्यांत काम पूर्ण करण्याचे नियोजन
Municipal Corporation Schools CCTV Project
Municipal Corporation Schools CCTV ProjectPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर लक्ष ठेवण्यासाठी आता सीसीटीव्ही यंत्रणेचा विस्तार करण्यात येणार आहे. शाळांच्या परिसरातील देखरेख अधिक प्रभावी करण्यासाठी अतिरिक्त कॅमेरे बसविण्यासह विद्युत जोडणी आणि नेटवर्क यंत्रणाही उभारली जाणार आहे.

Municipal Corporation Schools CCTV Project
Diwali Lakshmi Idols: लक्ष्मीपूजनासाठी बाजारपेठा सजल्या; दाक्षिणात्य शैलीतील मूर्तींना ग्राहकांची पसंती!

या कामासाठी १ कोटी ९९ लाख ५५ हजार ६३७ रुपये खर्च करण्यात येणार असून, आयसिक्युअर आयटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची निविदा स्वीकारण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. आठ महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

Municipal Corporation Schools CCTV Project
Maharashtra Electric Buses: महाराष्ट्रात ५० हजार ई-बस धावणार; २०३० पर्यंत ५२ टक्के हरित ऊर्जेचे उद्दिष्ट!

महापालिकेच्या शाळांमध्ये सीसीटीव्हीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या हालचालींवर देखरेख ठेवण्याची व्यवस्था अधिक सक्षम करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यानुसार विद्युत विभागाने आवश्यक उपकरणे आणि तांत्रिक सुविधांचा समावेश असलेले अंदाजपत्रक तयार करून निविदा प्रक्रिया राबवली. या प्रक्रियेत चार कंपन्यांनी सहभाग घेतला. त्यापैकी तीन कंपन्या तांत्रिकदृष्ट्या पात्र ठरल्या, तर एका कंपनीची निविदा अपात्र ठरविण्यात आली.

Municipal Corporation Schools CCTV Project
Sugar Price Hike: दिवाळीत साखरेचा गोडवा महागणार? घाऊक दरांत क्विंटलमागे ३०० रुपयांची वाढ; ५५०० रुपयांवर स्थिरावले भाव!

पात्र कंपन्यांमध्ये आयसिक्युअर आयटी प्रा. लि.ने अंदाजपत्रकीय दरापेक्षा ०.२२ टक्के कमी दराने निविदा भरली. जे. डी. एंटरप्रायझेस आणि निखिल नेटवर्क्स यांनी अंदाजपत्रकीय दराने निविदा सादर केली. त्यामुळे सर्वांत कमी दराची निविदा असलेल्या आयसिक्युअर आयटी कंपनीची निवड करण्यात आली. या प्रकल्पात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह डीव्हीआर, कॉपर वायरिंग, नेटवर्क केबल, एचडीएमआय केबल, नेटवर्क स्विच, विद्युत जोडणी आणि अन्य आवश्यक साहित्य बसविण्यात येणार आहे. त्यासाठी जीएसटीसह एक कोटी ९९ लाख ५५ हजार ६३७ रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

Municipal Corporation Schools CCTV Project
Unaided to Aided Teacher Transfer: विनाअनुदानित शिक्षकांच्या अनुदानितवर बदलीचे प्रस्ताव तातडीने सादर करा; शिक्षण आयुक्तांचे आदेश!

आठ महिन्यांत सीसीटीव्‍ही यंत्रणेचा विस्तार

संबंधित कंपनीने कामगिरी हमीपोटी आवश्यक बँक गॅरंटी सादर केली आहे. कामाची अंमलबजावणी मान्य तांत्रिक निकषांनुसार करण्याची जबाबदारी विद्युत विभागावर राहणार आहे. विशेष म्हणजे, २०२६-२७ च्या महापालिका अर्थसंकल्पात या कामासाठी निधीची तरतूदही करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या आठ महिन्यांत शाळांमधील सीसीटीव्ही यंत्रणेचा विस्तार होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.