Ketan Agarwal Murder Case: केतन अगरवाल खून प्रकरणात लोहगडावर ‘क्राईम रिक्रिएशन’; तपासाला निर्णायक वळण

आरोपी सिया गोयलला घटनास्थळी नेऊन संपूर्ण घटनाक्रमाची पडताळणी करण्यात आली असून नियोजित कटाचे नवे धागेदोरे समोर आले आहेत
Ketan Agarwal Murder Case
Ketan Agarwal Murder CasePudhari
Published on
Updated on

पुणे/ लोणावळा: केतन अगरवाल खून प्रकरणाच्या तपासाला रविवारी (दि. २८) निर्णायक वळण मिळाले. पहाटे पाचच्या सुमारास आरोपी सिया गोयलला कडेकोट पोलिस बंदोबस्तात लोहगडावर नेऊन 'क्राईम रिक्रिएशन' करण्यात आले. केतन अगरवालचा डमी पुतळा तयार करून ज्या ठिकाणावरून त्‍याला दरीत ढकलल्याचा आरोप आहे, त्याच ठिकाणावरून पुतळा खाली फेकत संपूर्ण घटनाक्रमाची प्रत्यक्ष पडताळणी पोलिसांनी केली. त्यामुळे तपासातील अनेक दुवे अधिक भक्कम झाल्याचे मानले जात आहे.

Ketan Agarwal Murder Case
Chakan Extortion Case: चाकणमध्ये खंडणीसाठी अपहरणाचा धक्कादायक प्रकार; चौघांना अटक

तपास अधिक मजबूत करण्यासाठी सियाकडून घटनास्थळी प्रत्येक हालचाल करून घेण्यात आली. तिने केतनला नेमके कुठे उभे केले, स्वतः कुठे थांबली आणि चेतन चौधरीला कसा संकेत दिला, याची माहिती पोलिसांनी प्रत्यक्ष घटनास्थळी तपासून घेतली. या संपूर्ण कारवाईचे चित्रीकरणही करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. क्राईम रिक्रिएशनदरम्यान लोहगडावर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पर्यटकांसाठी काही काळ किल्ला पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता.

Ketan Agarwal Murder Case
Pune Monsoon Rainfall Update: पुणे जिल्ह्यात काही भागांत दमदार पावसाची हजेरी; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

विशेष म्हणजे, या कारवाईसाठी सियाला घटनास्थळी आणण्यात आले; मात्र, सहआरोपी चेतन चौधरीला पोलिसांनी रविवारी लोहगडावर आणले नव्हते. तपासानुसार, केतन अगरवाल याला संपविण्याचा कट कोंढवा परिसरातील लुल्ला नगर येथील एका कॅफेमध्ये अनेक बैठका घेऊन रचण्यात आला होता. सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी केतनला मार्गातून दूर करण्यासाठी नियोजनबद्ध कट आखला होता. केतनला कुठे न्यायचे, कोणत्या ठिकाणी त्याचा घात करायचा, अपघाताचा आभास कसा निर्माण करायचा आणि संशय कसा टाळायचा, याचे नियोजन आरोपींनी आधीच केल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानुसार १८ जून रोजी सियाने केतनला लोहगडावर नेले, तर चेतन आधीपासूनच किल्ल्यावर उपस्थित होता. ठरलेल्या ठिकाणी पोहचल्यानंतर सियाने खाली बसून चेतनला संकेत दिला आणि त्यानंतर त्याने मागून येत केतनला दरीत ढकलल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. त्यानंतर तोल जाऊन पडल्याची कथा सांगत अपघाताचा बनाव रचल्‍याचे तपासात निष्पन्‍न झाले आहे.

Ketan Agarwal Murder Case
Diesel Price Impact On Farmers: इंधन दरवाढीचा शेतकऱ्यांना मोठा फटका; मशागतीचा खर्च गगनाला भिडला

केतनचे वडील विशाल अगरवाल यांनी सुरुवातीपासून व्यक्त केलेल्या संशयामुळे तपासाला नवी दिशा मिळाली. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन, डिजिटल पुरावे आणि आरोपींच्या चौकशीच्या आधारे पोलिसांनी संपूर्ण कटाचा उलगडा केल्याचा दावा केला आहे. रविवारी झालेल्या क्राईम रिक्रिएशनमुळे आरोपींच्या जबाबातील तपशील आणि घटनास्थळी घडलेला कथित घटनाक्रम यांची पडताळणी करण्यास तपास यंत्रणेला महत्त्वाची मदत मिळाल्याचे सांगितले जात आहे. पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्‍या मार्गदर्शनाखाली ही क्राईम रिक्रिएशनची प्रक्रिया पार पडली.

Ketan Agarwal Murder Case
Shirur Market Committee Election: शिरूर बाजार समिती निवडणूक: शेतकरी विरुद्ध कारखानदार अशी चुरस

सोबत राहणे टाळण्यासाठी सियाने १८ जूनलाच घात करण्याचे ठरवले

केतन अगरवाल हत्या प्रकरणाच्या तपासात दररोज धक्कादायक माहिती समोर येत असून, आरोपी सिया गोयलने केतनचा घात करण्यासाठी १८ जून ही तारीख अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने निवडल्याची माहिती तपासातील सूत्रांनी दिली.

१९ जून रोजी महाबळेश्वर येथे स्वतःच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या सेलिब्रेशनदरम्यान केतन सोबत एकाच खोलीत राहावे लागू नये, यासाठी त्याच्या आदल्या दिवशीच लोहगडावर नेऊन त्याचा खून करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी हा कट अत्यंत बारकाईने आखला होता. गुन्हा करण्यापूर्वी सियाने दोन वेळा लोहगड किल्ल्यावर जाऊन पाहणी केली होती. त्यानंतर तिने केतनला लोहगडावर येण्यास प्रवृत्त केले आणि संधी साधून त्याला दरीत ढकलल्याचे तपासात निष्पन्‍न झाले आहे.

Ketan Agarwal Murder Case
Katraj Health Center Inauguration: कात्रज जाधवनगर आरोग्य केंद्र सुरू; भाजप-राष्ट्रवादीत श्रेयवाद रंगला

सूत्रांच्या माहितीनुसार, सिया गोयल ही अगरवाल कुटुंबाची सून होणार असल्याने विवाहाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली होती. लग्नाचे ठिकाण निश्चित झाले होते, तर १९ जूनला सियाचा वाढदिवस असल्याने महाबळेश्वर येथे सेलिब्रेशनचे नियोजन करण्यात आले होते. त्यासाठी हॉटेलचे बुकिंगही केले होते. मात्र, त्यावेळी केतनसोबत एकाच खोलीत राहावे लागू नये, अशी सियाची इच्छा होती. त्यामुळेच तिने १८ जूनलाच केतनला कायमचा मार्गातून दूर करण्याचा निर्णय घेतल्याचे तपासात समोर आले आहे.

त्यामुळे विदेश दौरा रद्द झाला

तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ६ जून रोजी प्री-वेडिंग शूटसाठी केतन आणि सिया इंडोनेशियातील बाली येथे जाणार होते. मात्र, तेथेही केतनसोबत एकाच खोलीत राहण्याची वेळ येऊ नये, यासाठी सियाने त्याचा पासपोर्ट बॅगमधून काढून खालापूर येथील एका फूड मॉलच्या स्वच्छतागृहात टाकून फ्लश केल्‍याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे हा विदेश दौरा रद्द झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news