Diesel Price Impact On Farmers: इंधन दरवाढीचा शेतकऱ्यांना मोठा फटका; मशागतीचा खर्च गगनाला भिडला

डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे नांगरट, पेरणीसह सर्व कृषी कामांचे दर वाढले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत
Petrol Diesel Price Hike
Petrol DieselPudhari
Published on
Updated on

बारामती: पाऊस नाही, जनावरांना चारा नाही, पेरण्या नाहीत, वाढलेली प्रचंड महागाई... अशातच आता शेतकऱ्यांना सतत वाढत असलेल्या इंधन दराचाही फटका सहन करावा लागत आहे. इंधनाचे दर वाढल्याने शेती मशागतीचा खर्च वाढला आहे. त्यामुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.

Petrol Diesel Price Hike
Shirur Market Committee Election: शिरूर बाजार समिती निवडणूक: शेतकरी विरुद्ध कारखानदार अशी चुरस

गेल्या महिन्यात इंधन दरात सलग तीन वेळा वाढ झाली आहे. यामुळे शेतीसाठी लागणाऱ्या सर्व मशागतींच्या खर्चात वाढ झाली असून, शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. जेसीबी चालकांनी प्रतितासाचा दर हजार रुपयांवरून बाराशे रुपये केला आहे. याशिवाय नांगरट, रोटर, पेरणी, सरी काढणे आदी कामांसाठी शेतकऱ्यांना जादा खर्च करावा लागत आहे. फक्त डिझेलचेच दर वाढले नाहीत तर स्पेअर पार्ट, वाहनांना लागणारे ऑईल यामध्येही वाढ झाली आहे.

Petrol Diesel Price Hike
Katraj Health Center Inauguration: कात्रज जाधवनगर आरोग्य केंद्र सुरू; भाजप-राष्ट्रवादीत श्रेयवाद रंगला

अमेरिका-इराण युद्ध थांबल्यानंतरही होणारी इंधन दारवाढ शेतकऱ्यांसाठी कर्जाच्या खाईत लोटणारी ठरली. आधीच खतांच्या वाढलेल्या किंमती, शेतमजुरी, वीज समस्यांमुळे शेतकरी अडचणीत आहे. त्यातच भाजीपाला, कांदा आणि इतर पिकांना अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडला आहे. सरकारकडून ३० जूनपर्यंत कर्जमाफीची घोषणा करण्यात आली असली तरी, वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकरी या संकटातून सावरणार का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

Petrol Diesel Price Hike
Pune Drainage Work Delay: लोहगाव-वाघोली रस्त्यावरील पावसाळी वाहिनी काम संथ; नागरिक हैराण

ट्रॅक्टर व्यावसायिकांनी सांगितले की, इंधन दरवाढीमुळे जुन्या दरात मशागत करणे परवडत नाही. सोमेश्वर जेसीबी संघटनेच्या वतीने याबाबत सोमेश्वरनगर येथे चौकात बॅनर लावून दर वाढीची माहिती देण्यात आली आहे. या ट्रॅक्टर तसेच जेसीबीचालकांनी वाढलेल्या डिझेल दरामुळे मशागतीचे दर वाढवले आहेत. या वाढत्या महागाईमुळे शेती करावी की नाही, असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

Petrol Diesel Price Hike
Maharashtra Government Land Lease: शासकीय जमिनींच्या नोंदीत मोठा बदल; ‘महाराष्ट्र शासन’च कब्जेदार

मशागतीच्या दरात मोठी वाढ

  • नांगरट ३०००- ३५००

  • रोटर २०००- २५००

  • कल्टीवेटर १२००- १६००

  • सरी काढणे १८००- २२००

  • पेरणी २०००-२५००

जेसीबींचे वाढलेले दर

  • जेसीबी बकेट काम १२०० रुपये प्रतितास

  • जेसीबी ब्रेकर काम १७०० रुपये प्रतितास

  • डबर व मुरूम भरणे २०० रुपये ब्रास

  • डंपिंग खत भरणे ४०० रुपये

  • चारचाकी ट्रेलर भरणे ६०० रुपये

  • माती भरणे १५० रुपये ब्रास

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news