Chakan Extortion Case: चाकणमध्ये खंडणीसाठी अपहरणाचा धक्कादायक प्रकार; चौघांना अटक

खोटा आरोप करून केटरिंग व्यावसायिकाचे अपहरण करत मारहाण व २ लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी चाकण उत्तर पोलिसांची कारवाई
Extortion News
Extortion NewsPudhari
Published on
Updated on

चाकण: खेड तालुक्यातील वाकी खुर्द परिसरात एका केटरिंग व्यावसायिकाला दोन मुलींची छेड काढल्याचा खोटा आरोप करून त्याच्याकडून २ लाख रुपये उकळण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फिर्यादीचे अपहरण करून त्याला मारहाण करण्यात आली. तसेच, धारदार शस्त्राचा धाक दाखवत खंडणीची मागणी केली.

Extortion News
Pune Monsoon Rainfall Update: पुणे जिल्ह्यात काही भागांत दमदार पावसाची हजेरी; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

याप्रकरणी चाकण उत्तर पोलिसांनी सनी वैजिनाथ उघडे (वय १९), अनिकेत पुरुषोत्तम ढोले (वय २१), रवी संतोष परघरमोल (वय १८) आणि प्रेम गिरीष अंकुश (वय २१) या चौघांना अटक केली आहे.

Extortion News
Diesel Price Impact On Farmers: इंधन दरवाढीचा शेतकऱ्यांना मोठा फटका; मशागतीचा खर्च गगनाला भिडला

आरोपींनी फिर्यादीला फोन करून दोन मुलींची छेड काढल्याचा आरोप केला. या प्रकरणात पोलिसात तक्रार होऊ नये, यासाठी २ लाख रुपये द्यावे लागतील, अशी धमकी त्यांनी दिली. मात्र, फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी त्याला जबरदस्तीने रिक्षात बसवून नेले.

Extortion News
Shirur Market Committee Election: शिरूर बाजार समिती निवडणूक: शेतकरी विरुद्ध कारखानदार अशी चुरस

आरोपींनी रोख ४५ हजार रुपये आणि ऑनलाइन व्यवहारातून १० हजार ९५० रुपये जबरदस्तीने उकळले. तसेच, फिर्यादीची दुचाकी ताब्यात घेऊन आणखी पैशांची मागणी केल्याचेही समोर आले आहे. याप्रकरणी चाकण उत्तर पोलिस ठाण्यात अपहरण, खंडणी, मारहाण, धमकी आणि शस्त्र कायद्यांतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Extortion News
Katraj Health Center Inauguration: कात्रज जाधवनगर आरोग्य केंद्र सुरू; भाजप-राष्ट्रवादीत श्रेयवाद रंगला

त्यानंतर आरोपींनी फिर्यादीला बेल्ट व हाताने मारहाण केली. तसेच, धारदार शस्त्राचा धाक दाखवून पैसे देण्यासाठी दबाव टाकला. एवढ्यावरच न थांबता त्यांनी फिर्यादीला त्याच्या केटरिंगच्या ग्राहकांकडे नेऊन पैसे आणण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news