

काटेवाडी: मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अनुषंगाने काटेवाडी गावात प्लास्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ग््राामपंचायतीकडून ठोस पावले उचलण्यात आली आहेत.
गावातील व्यावसायिक, दुकानदार व व्यापाऱ्यांना एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकच्या वापरावर पूर्ण बंदी असल्याबाबत ग््राामपंचायत अधिकारी बाळासाहेब भोइटे यांनी नोटिसवजा सूचना दिल्या आहेत. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या काही दुकानदारांवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे.
या वेळी उपसरपंच मिलिंद काटे, अजित काटे, विशाल सुतार, दादासाहेब भिसे, मनिष लोंढे, सचिन शिंदे, सचिन यादव, रविंद्र भिसे आदी उपस्थित होते. परिसर स्वच्छ, पर्यावरणपूरक व आरोग्यदायी राहावा, या उद्देशाने ही कारवाई करण्यात येत असून प्लास्टिक पिशव्या, थर्माकोल साहित्य व इतर प्रतिबंधित प्लॅस्टिक वस्तूंच्या वापरावर लक्ष ठेवण्यात येत आहे.
ग््राामपंचायत पथकाने दुकाने, हॉटेल्स, किराणा दुकाने व हातगाड्यांची तपासणी करून प्लॅस्टिकचा साठा जप्त केला. नियम मोडणाऱ्यांना दंड ठोठावण्यात आला असून भविष्यात पुनरावृत्ती झाल्यास कठोर कारवाईचा इशारा देखील देण्यात आला आहे. या वेळी अधिकारी बाळासाहेब भोइटे यांनी दुकानदारांना कागदी पिशव्या, कापडी पिशव्या व पर्यावरणस्नेही पर्यायांचा वापर करण्याचे आवाहन केले.
प्लास्टिकमुळे पर्यावरणाचे नुकसान होत असून मानवी आरोग्यावर देखील विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे सर्वांनी स्वयंस्फूर्तीने प्लास्टिकमुक्त गावासाठी सहकार्य करावे, असे आवाहन उपसरपंच मिलिंद काटे यांनी केले. या मोहिमेमुळे गावात स्वच्छतेबाबत जनजागृती वाढत असून अनेक व्यापाऱ्यांनी पर्यायी साहित्याचा वापर सुरू केला आहे. ग््राामपंचायतीने नागरिकांना प्लास्टिक वापर टाळण्याचे आवाहन केले, असून ही कारवाई नियमितपणे सुरू राहणार असल्याचे सदस्य अजित काटे यांनी स्पष्ट केले आहे.