

मंचर: आंबेगाव तालुक्यातील कळंब-महाळुंगे रस्त्यावर एमडीआर-6 (कि.मी. 59/00 ते 61/00) अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप करत ग््राामस्थांनी तीव संताप व्यक्त केला. सोमवारी (दि. 5) ग््राामस्थांनी एकत्र येत हे काम तत्काळ बंद पाडले. निकृष्ट दर्जाचे झालेले काम उखडून ते पुन्हा शासनाच्या तांत्रिक निकषांनुसार करण्यात यावे, अशी ठाम मागणी ग््राामस्थांनी केली आहे.
रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरणाच्या नावाखाली नियमबाह्य व हलगर्जी पद्धतीने काम सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर कळंब परिसरातील ग््राामस्थ आक्रमक झाले. सुमारे दीड कोटी रुपये खर्च करून सुरू असलेल्या या रस्त्याच्या कामात खोदकाम, साईड वॉटर गटर, मुरूम पुरवठा, बिट्युमिनस मॅकॅडम, सील कोट, ओपन ग््रेाडेड प्रीमिक्स कार्पेट, साईड विड्थ तसेच विविध सुरक्षाविषयक कामांचा समावेश आहे. मात्र, प्रत्यक्षात आवश्यक जाडीप्रमाणे थर न टाकणे, निकृष्ट मुरूम व खडीचा वापर, योग्य कॉम्पॅक्शन न करणे तसेच तापमान व इतर तांत्रिक मापदंडांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप हुतात्मा बाबू गेनू युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबाजी चासकर यांनी केला. विशेष म्हणजे, डांबरीकरणासाठी वापरण्यात येणारे साहित्य दर्जाहीन असल्याचे स्पष्टपणे दिसून येत असून, काही ठिकाणी रस्ता पूर्ण होण्याआधीच खचणे, उखडणे व भेगा पडू लागल्याचे ग््राामस्थांचे म्हणणे आहे.
या निकृष्ट कामामुळे भविष्यात अपघात होण्याची दाट शक्यता असून, सार्वजनिक निधीचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत असल्याचा संताप ग््राामस्थांनी व्यक्त केला. या प्रकाराबाबत संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांना वेळोवेळी सूचना देऊनही कोणतीही दखल न घेतल्याने अखेर बाबाजी चासकर, दीपक चिखले, संतोष आंबटकर, बाळासाहेब जाधव, सुदाम पडवळ, ज्ञानेश्वर माऊली पडवळ, दत्ता चासकर, पांडुरंग बनकर, संजय आंबटकर आदींसह महाळुंगे पडवळ, विठ्ठलवाडी, टाकेवाडी, नांदूर, कळंब व साकोरे परिसरातील ग््राामस्थांनी एकत्र येत रस्त्याचे काम बंद पाडले.
कामाचे स्वतंत्र तांत्रिक ऑडिट करण्याची मागणी
दरम्यान, काम सुरू असताना सुरक्षाविषयक उपकरणांचा अभाव दिसून येत असून, ठेकेदारांकडून नियुक्त करण्यात आलेल्या कामगारांना आवश्यक संरक्षणात्मक साधने उपलब्ध नसल्याने अपघात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. कामाचे स्वतंत्र तांत्रिक ऑडिट करण्याची मागणीही ग््राामस्थांकडून जोर धरू लागली आहे. ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कथित मिलीभगतमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप करत ग््राामस्थांनी तीव नाराजी व्यक्त केली.
तोपर्यंत काम सुरू करू देणार नाही
‘जोपर्यंत दर्जेदार साहित्य वापरून शासनाच्या तांत्रिक नियमांनुसार काम केले जात नाही, तोपर्यंत काम सुरू करू देणार नाही,’ असा ठाम इशारा ग््राामस्थांनी दिला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन कामाची चौकशी करावी, दोषी ठेकेदारांवर कारवाई करावी, निकृष्ट झालेले काम उखडण्याचे आदेश द्यावेत तसेच दर्जेदार कामाची हमी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.