पवार काका-पुतणे जरी विभक्त झाले असले, तरी जुन्नर तालुक्यात दोन्ही पवारांशी चागले सुत आ.अतुल बेनके यांनी जुळवले आहे. दोघांनाही वाटत आहे, की आ. बेनके आपल्या सोबत आहेत. बेनके यांनी तटस्थ राहण्याची जरी भूमिका जाहीर केली असली, तरी धाकले धनी म्हणजेच अजित पवार यांच्याबरोबर ते जाऊ शकतात. आ.अतुल बेनके यांनी शरद पवार यांच्या सोबत राहावे, असा जुन्या कार्यकर्त्यांचा आग्रह असला, तरी तालुक्याचा विकास करण्यासाठी निधी लागतो आणि निधी अजित पवारच देऊ शकत असल्याने बेनके यांचा कल अजित पवार यांच्याकडे जास्त दिसत असून, बहुतांशी कार्यकर्ते आ. बेनके जो निर्णय घेतील तो मान्य करू शकतात.