Balasaheb Thorat : पक्षांतर बंदी कायद्याचे पालन होत नाही : आ. थोरात | पुढारी

Balasaheb Thorat : पक्षांतर बंदी कायद्याचे पालन होत नाही : आ. थोरात

संगमनेर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : निवडून यायचे एका पक्षातून नंतर मात्र फाटाफुट करायची अन दुसऱ्या पक्षामध्ये जायचे यातून लोकशाहीला खूप मोठा धोका निर्माण झाला आहे. राजकीय पक्षांतराच्या घटनांना आळा घालण्यासाठी संसदेने मंजूर केलेल्या पक्षांतर बंदी कायद्याचे राज्यात पालन होत नाही, अशी खंत काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.

प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना आ. थोरात म्हणाले की, शिवसेनेत फूट पडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आमदारांचा मोठा गट बाहेर पडला. राज्यातील सत्ता संघर्षाचा पेच सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. सर्वोच्च न्यायालयाने संविधानातील तरतुदीनुसार आमदार अपात्रतेच्या संदर्भात निर्णय घेण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. न्यायालयाने आदेश देऊन चार महिने उलटून गेले तरी विधानसभा अध्यक्षांकडे हे प्रकरण प्रलंबित आहे. न्याय बुद्धीने निरपेक्ष भावना ठेवून लोकशाही आणि कायदा जपायचा ही भावना ठेवून विधानसभा अध्यक्षांनी निर्णय प्रक्रिया करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

हेही वाचा

Ganeshotsav Nashik : साडेपाचशे गणेश मंडळांचे परवानगीसाठी अर्ज, २३२ मंडळांना परवानगी

विवाहित भावाच्या जागी अनुकंपा नोकरी मागण्यास बहीण अपात्र : कर्नाटक उच्च न्यायालय

ठाणे परिवहनचे कर्मचारी संपावर; सकाळपासून शंभर फेर्‍या रद्द

Back to top button