Narayangaon Crime: वृद्धेला घरात घुसून लुटले, CCTV कैद झाला... चकवा द्यायला कपडेही बदलले; शेवटी पोलिसांनी पकडलंच

सावरगाव येथील धक्कादायक घटनेनंतर पोलिसांची कारवाई; सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीला अटक
Narayangaon Crime
Narayangaon CrimePudhari
Published on
Updated on

नारायणगाव: सावरगाव (ता. जुन्नर) येथे आठ दिवसापूर्वी दुपारच्या वेळी एका वयोवृद्ध महिलेच्या घरात घुसून मारहाण करत सोन्याचे मंगळसूत्र हिसकावणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर व किरण अवचर यांनी दिली.

Narayangaon Crime
Pune BJP 100 Days Performance: पुणे महापालिकेत भाजपच्या 100 दिवसांवर काँग्रेसचा हल्लाबोल

जुन्नर पोलीस स्टेशन हद्दीत दि. २२ एप्रिल रोजी ही घटना घडली होती. फिर्यादी कल्पना बाजीराव राजगुरू (वय ६२, रा. सावरगाव, ता. जुन्नर, जि. पुणे) या दुपारच्या वेळी घरी एकट्या असताना एका अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात घुसून त्यांच्यावर हल्ला केला. आरोपीने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. तसेच त्यांना जबर मारहाण करून तोंडात दगड कोंबून चार दात पाडल्याची धक्कादायक घटना घडली होती.

Narayangaon Crime
Pune Tree Census Contract Controversy: पुण्यात वृक्षगणना कंत्राटावर वाद; सार आयटी कंपनीच्या निवडीवर प्रश्न

या प्रकरणी जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी आरोपीला तात्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास करत घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले.

Narayangaon Crime
Nandur Gram Panchayat Election Result 2026: रुपाली चाकणकरांना आणखी एक धक्का; सख्ख्या भावाचा पराभव

त्यामध्ये एक संशयित मोटारसायकलवरून जाताना दिसून आला. पुढे नारायणगावच्या दिशेने गेल्यानंतर आरोपीने पोलिसांना चकवा देण्यासाठी कपडे बदलले व वारंवार मार्ग बदलला. तरीही गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा मागोवा घेत भोसरीपर्यंत सीसीटीव्ही फुटेज गोळा केले. गोपनीय माहितीच्या आधारे संशयिताची ओळख रवींद्र गणपत राजगुरू (वय ५४, सध्या रा. अक्षय नगर, भोसरी, पिंपरी-चिंचवड; मूळ रा. सावरगाव, ता. जुन्नर) अशी पटली. दि. २८ एप्रिल रोजी तो घोडेगाव फाटा येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

Narayangaon Crime
Pune Property Tax Rebate Environment Projects: पर्यावरण प्रकल्पांवरील करसवलतींची तपासणी; महापालिकेचा सोसायट्यांवर धडाका

चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून, फिर्यादी महिला वयस्कर व घरी एकट्या असल्याचे लक्षात घेऊनच त्याने हा गुन्हा केल्याचे सांगितले. त्याच्या ताब्यातून चोरीस गेलेले सोन्याचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले आहे. आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी त्याला जुन्नर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले असून पुढील तपास रघुनाथ शिंदे करत आहेत.

ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, पोलीस निरीक्षक किरण अवचर, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, सहाय्यक फौजदार दीपक साबळे, पोलीस हवालदार राजू मोमीन, संदीप वारे, अक्षय नवले व पोलीस शिपाई अभिमन्यू मोटे यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news