Pune Property Tax Rebate Environment Projects: पर्यावरण प्रकल्पांवरील करसवलतींची तपासणी; महापालिकेचा सोसायट्यांवर धडाका

सौर, गांडूळखत, रेन वॉटर प्रकल्प बंद आढळल्यास दंडासह वसुली; 1.64 लाख मालमत्तांची तपासणी शक्य
Property Tax
Property TaxPudhari
Published on
Updated on

पुणे: सौर पॅनल, गांडुळ खत व रेन वॉटर हार्वेस्टींग यांसारखे पर्यावरणीय प्रकल्प राबवून महापालिकेच्या मिळकतकर सवलत घेणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्या आता महापालिकेच्या रडारवर आल्या आहेत. ज्या सोसायट्यांनी अशा पर्यावरणीय प्रकल्प चालू असल्याचे दाखवून करात सवलत घेतली आहे. अशा प्रकल्पांची तपासणी महापालिकेकडून केली जाणार आहे. त्यात ज्यांचे प्रकल्प बंद आवस्थेत आढळतील त्यांच्याकडून दंडासह कराची रक्कम वसूल केली जाणार आहे.

Property Tax
Mahabeej 50 Years: महाबीजचे सुवर्णमहोत्सवी वर्ष; दर्जेदार बियाणे पुरवठ्याचा गौरव

महापालिका प्रशासनाकडून पर्यावरणाच्या संवर्धनासाठी शहरामधील सोसायट्यांमध्ये सौर ऊर्जा पॅनल, गांडुळ खत, रेन वॉटर हार्वेस्िंटग यांसारखे पर्यावरणपुरक प्रकल्पांना प्रोत्साहन दिले जाते. असे प्रकल्प राबविणाऱ्या सोसायट्यांना मिळकतकरात 5 ते 10 टक्क्यांपर्यंतची सवलत दिली जाते. शहरात नव्याने होणाऱ्या बहुतांश सोसायट्यांमध्ये अशा पर्यावरण पुरक प्रकल्प राबविले जात असून त्यापोटी मिळकतकराची सवलत घेतली जात असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.

Property Tax
Pune Illegal Hill Cutting Landslide Risk: पुणे जिल्ह्यात डोंगर तोडफोडीमुळे दरडीचा धोका; पावसाळ्यापूर्वी चिंता

मात्र, अनेक सोसायट्यांमधील हे पर्यावरणीय प्रकल्प देखभाल दुरुस्तीसह वेगवेगळ्या कारणांमुळे बंद पडलेले आहेत.असे असतानाही महापालिकेकडून तपासणी न करताच त्यांना मिळकतकरात सवलत दिली जात असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे महापालिकेची फसवणूक होत आहे. मात्र, या अशा प्रकरणांची आता मिळकतकर विभागानेच गंभीर दखल घेतली आहे.

Property Tax
Maharashtra Chickpea Procurement: हरभरा खरेदी लक्ष्य पूर्ण तरीही शेतकऱ्यांचा माल बाकी; मुदतवाढीची मागणी

त्यानुसार पर्यावरण प्रकल्पांसाठी ज्या सोसायट्यांनी मिळकतकरात सवलत घेतली आहे. अशा सर्व सोसायट्यांमधील प्रकल्पांची तपासणी करण्यासंबधीचा प्रस्ताव मिळकतकर विभागाने आयुक्तांकडे मंजुरीसाठी ठेवला आहे. या प्रस्तावानुसार करात सवलत घेणाऱ्या सोसायट्यांमधील प्रकल्प बंद अवस्थेत आढळ्यास त्यांच्याकडून सवलती पोटी दिलेली रक्कम आणि त्यांवर दंडात्मक रक्कमेची वसुली केली जाणार असल्याची माहिती मिळकतकर विभागाचे प्रमुख रवि पवार यांनी दिली.

Property Tax
Maharashtra Onion Harvest Heatwave: उष्णतेचा कांदा काढणीवर परिणाम; ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत

2026-27 मधील मिळकत कर सवलतीची माहिती

  • सौर प्रकल्प 34 हजार 884 2 कोटी 2 लाख 34 हजार 439

  • गांडूळखत 47 हजार 874 1 कोटी 93 लाख 71 हजार 123

  • रेन वॉटर हार्वेस्िंटग 4 हजार 881 22 लाख 35 हजार 202

  • रेन वॉटर/गांडुळखत 10 हजार 947 82 लाख 58 हजार 105

  • सौर/गांडुळखत/रेन वॉटर 7 हजार 453 98 लाख 24 हजार 54

  • सौर/रेन वॉटर 9 हजार - 104 1 कोटी 17 लाख 8 हजार 776

  • सौर/गांडुळखत 49 हजार 763 5 कोटी 58 लाख 72 हजार 131

  • एकूण 1 लाख 64 हजार 906 12 कोटी 75 लाख 3 हजार 830

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news