Pune BJP 100 Days Performance: पुणे महापालिकेत भाजपच्या 100 दिवसांवर काँग्रेसचा हल्लाबोल

भ्रष्टाचार, अपूर्ण आश्वासने आणि विस्कळीत कारभाराचा आरोप; तीव आंदोलनाचा इशारा
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationPudhari
Published on
Updated on

पुणे: महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळून 100 दिवस पूर्ण होताच काँग््रेासने सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. हा कार्यकाळ पुणेकरांची फसवणूक करणारा आणि भष्टाचाराने ग््राासलेला असल्याचा आरोप शहर काँग््रेासचे अध्यक्ष अरविंद शिंदे आणि गटनेते ॲड. रामचंद्र ऊर्फ चंदूशेठ कदम यांनी केला.

Pune Municipal Corporation
Pune Tree Census Contract Controversy: पुण्यात वृक्षगणना कंत्राटावर वाद; सार आयटी कंपनीच्या निवडीवर प्रश्न

प्रशासकीय यंत्रणा आणि सत्ताधारी भाजप यांच्यात ‌‘अर्थ‌’पूर्ण साटलोटे असल्याचा आरोप करत पुढील काळात तीव आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला. भाजपने जाहीरनाम्यात दिलेली 500 चौरस फुटांच्या घरांना करमाफी आणि महिलांच्या नावावरील मिळकतींना सवलत ही आश्वासने अद्याप पूर्ण न झाल्याचे काँग््रेासने नमूद केले.

Pune Municipal Corporation
Nandur Gram Panchayat Election Result 2026: रुपाली चाकणकरांना आणखी एक धक्का; सख्ख्या भावाचा पराभव

महापौर, स्थायी समिती अध्यक्ष आणि सभागृह नेते यांच्यातील अंतर्गत वादामुळे विकासकामे ठप्प झाल्याचा आरोपही करण्यात आला.शहरात वाढती वाहतूक कोंडी आणि विस्कळीत पाणीपुरवठा ही परिस्थिती गंभीर असल्याचे काँग््रेासने म्हटले आहे.

Pune Municipal Corporation
Pune Property Tax Rebate Environment Projects: पर्यावरण प्रकल्पांवरील करसवलतींची तपासणी; महापालिकेचा सोसायट्यांवर धडाका

पीएमपीएमएलमधील भरती व पदोन्नती प्रक्रियेतील अनियमितता, होर्डिंग निविदेतील वाद आणि कचरा प्रकल्पांतील कथित भष्टाचार यावर काँग््रेासने आवाज उठवला आहे. तसेच बिल्डरांना सवलती देण्याचे धोरण आणि नालेसफाईतील अनियमितता यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.

Pune Municipal Corporation
Mahabeej 50 Years: महाबीजचे सुवर्णमहोत्सवी वर्ष; दर्जेदार बियाणे पुरवठ्याचा गौरव

दरम्यान, शहरी गरीब आरोग्य योजनेतील उत्पन्नमर्यादा वाढवण्या बाबत काँग््रेासच्या पाठपुराव्याला यश आल्याचा दावा करण्यात आला. नदीकाठ विकास प्रकल्पालाही काँग््रेासने विरोध दर्शवला असून, पुणेकरांच्या हितासाठी आक्रमक भूमिका कायम ठेवणार असल्याचे पक्षाने स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news