Nandur Gram Panchayat Election Result 2026: रुपाली चाकणकरांना आणखी एक धक्का; सख्ख्या भावाचा पराभव

संतोष बोराटे यांचा 304 मतांनी पराभव; दौंड तालुक्यातील लक्षवेधी लढत संपन्न
Santosh Borate
Santosh BoratePudhari
Published on
Updated on

राहु: दौंड तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या नांदुर ग्रामपंचायतीच्या सरपंचदाच्या पोटनिवडणुकीत विशाल नरेंद्र थोरात यांनी बाजी मारली आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे सख्खे बंधू संतोष बबन बोराटे यांचा ३०४ मतांच्या फरकाने पराभव झाला आहे. संपूर्ण तालुक्याचे लक्ष या पोटनिवडणुकीकडे लागले होते.

Santosh Borate
Pune Property Tax Rebate Environment Projects: पर्यावरण प्रकल्पांवरील करसवलतींची तपासणी; महापालिकेचा सोसायट्यांवर धडाका

अडीच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत आमदार राहुल कुल समर्थकांनी एकत्र येत नांदुर ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते,त्यावेळी प्रथम लोकनियुक्त सरपंच म्हणून युवराज बबन बोराटे १९४ मतांनी निवडून आले होते.

Santosh Borate
Mahabeej 50 Years: महाबीजचे सुवर्णमहोत्सवी वर्ष; दर्जेदार बियाणे पुरवठ्याचा गौरव

सत्ताधाऱ्यांमध्ये ठरलेल्या कालावधीनुसार दोन वर्षांनंतर युवराज बोराटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या रिक्त जागेसाठी ही पोटनिवडणूक पार पडली. सरपंचपदासाठी संतोष बबन बोराटे,विशाल नरेंद्र थोरात,किरण विजय थोरात,जमालुद्दीन शेख, यशवंत बर्वे हे रिंगणात होते.

Santosh Borate
Pune Illegal Hill Cutting Landslide Risk: पुणे जिल्ह्यात डोंगर तोडफोडीमुळे दरडीचा धोका; पावसाळ्यापूर्वी चिंता

विशाल थोरात यांचे आई-वडील ही यापूर्वी सरपंच म्हणून कार्यरत असल्याने त्यांना दांडगा वारसा आणि अनुभवाची शिदोरी होती.बुधवारी दौंड येथे झालेल्या मतमोजणी मध्ये सुरुवातीला विशाल थोरात यांनी आघाडी घेतली होती.विशाल थोरात यांना ८३० मते, संतोष बोराटे यांना ५२६ मते मिळाली.

Santosh Borate
Maharashtra Chickpea Procurement: हरभरा खरेदी लक्ष्य पूर्ण तरीही शेतकऱ्यांचा माल बाकी; मुदतवाढीची मागणी

नांदुर गावामध्ये माळी आणि धनगर समाजाची लोकसंख्या निर्णायक आहे. या निवडणुकीत धनगर समाजातील विशाल थोरात यांनी आपले राजकीय कौशल्य आणि अनुभव पणाला लावत इतर दोन उमेदवार धनगर समाजातील असुनही मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला.येथे जमालुद्दीन शेख या उमेदवाराने तिसऱ्या क्रमांकाची १३५ मते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news