Pune Tree Census Contract Controversy: पुण्यात वृक्षगणना कंत्राटावर वाद; सार आयटी कंपनीच्या निवडीवर प्रश्न

मिळकत करातील त्रुटींनंतरही पुन्हा कंत्राट; पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह, प्रस्ताव रद्द करण्याची मागणी
Tree Plantation
Tree PlantationPudhari
Published on
Updated on

पुणे: मिळकत कराच्या कामातील गंभीर त्रुटींमुळे आधीच वादात सापडलेल्या ठेकेदार कंपनीलाच आता पुणे महापालिकेकडून वृक्षगणनेचे कोट्यवधी रुपयांचे काम देण्याची तयारी सुरू असल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. या निर्णयामागे राजकीय दबाव असल्याची चर्चा रंगत असून, महापालिकेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

Tree Plantation
Nandur Gram Panchayat Election Result 2026: रुपाली चाकणकरांना आणखी एक धक्का; सख्ख्या भावाचा पराभव

याबाबत अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी सांगितले की, शहरातील झाडांची गणना करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती आणि त्यानुसार ‌‘सार आयटी रिसोर्सेस प्रा. लि.‌’ या कंपनीची निवड करण्यात आली आहे. संबंधित कंपनी कोणत्याही संस्थेकडून ब्लॅकलिस्ट नसून मुंबई महापालिकेनेही त्यांना काम दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Tree Plantation
Pune Property Tax Rebate Environment Projects: पर्यावरण प्रकल्पांवरील करसवलतींची तपासणी; महापालिकेचा सोसायट्यांवर धडाका

मात्र, अद्याप वर्कऑर्डर देण्यात आली आहे की नाही, याबाबत त्यांनी अनिश्चितता व्यक्त केली. दरम्यान, या कंपनीने यापूर्वी 2016 साली महापालिकेच्या मिळकत कराच्या जीआयएस मॅपिंगच्या कामात गंभीर चुका केल्याचे समोर आले होते.

Tree Plantation
Mahabeej 50 Years: महाबीजचे सुवर्णमहोत्सवी वर्ष; दर्जेदार बियाणे पुरवठ्याचा गौरव

या त्रुटींमुळे हजारो नागरिकांच्या करसवलती रद्द झाल्या होत्या आणि मोठा वाद निर्माण झाला होता. महापालिकेच्या समितीच्या अहवालानुसार तब्बल 88 टक्के प्रकरणांमध्ये चुका आढळल्या होत्या. यानंतर कंपनीची बिले, सुरक्षा ठेव आणि बँक हमी मिळून सुमारे 12 कोटी रुपये जप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

Tree Plantation
Pune Illegal Hill Cutting Landslide Risk: पुणे जिल्ह्यात डोंगर तोडफोडीमुळे दरडीचा धोका; पावसाळ्यापूर्वी चिंता

असे असतानाही फेबुवारी 2026 मध्ये सुमारे 30 कोटी रुपयांचे वृक्षगणनेचे कंत्राट याच कंपनीला देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने टीका होत आहे. सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी या प्रस्तावाचा तातडीने फेरविचार करून तो रद्द करण्याची मागणी केली आहे.

ज्या कंपनीचा पूर्वेतिहास वादग््रास्त आहे, अशा कंपनीला पुन्हा मोठे कंत्राट देणे योग्य नाही. स्थायी समितीने हा निर्णय तातडीने रद्द करावा.

विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news