Jejuri Murder Case: जेजुरीत प्रेमविवाहातून खून; प्रेयसीच्या पतीचा कोयत्याने खात्मा

माळशिरस येथील धक्कादायक घटना; आरोपी सुशांत मापारी जेजुरी पोलिसांच्या ताब्यात
Murder
MurderPudhari
Published on
Updated on

जेजुरी: माळशिरस (ता. पुरंदर) येथे प्रेयसीच्या पतीचा कोयत्याने वार करून खून करणाऱ्या आरोपीस जेजुरी पोलिसांनी अटक केली. सुशांत संदीप मापारी (रा. माळशिरस) असे त्याचे नाव आहे. तसेच त्याच्या अल्पवयीन साथीदारासही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Murder
Pune Jilha Parishad Election: पुणे जिल्हा परिषद निवडणूक प्रतिष्ठेची; आघाड्यांमध्येही स्वबळाची चर्चा

जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरंदर तालुक्यातील राजेवाडी येथील दीपक जगताप याचा एक महिन्यापूर्वी पायल कांबळे हिच्याशी प्रेमविवाह झाला होता. पायलचा पहिला प्रियकर सुशांत मापारी याने दीपक व पायल यांना मोबाईलवर फोन करून, पायलबरोबर लग्न करायचे होते.

Murder
Daund Crime Situation: दौंड शहरात गुन्हेगारीचा उच्छाद, पोलिसांपुढे कायदा-सुव्यवस्थेचे आव्हान

तुम्ही लग्न केले. तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली होती. शनिवारी (दि. 13) प्रशांत याने दीपकला माळशिरस येथील रामकाठी शिवारात बोलावून घेतले. तेथे त्याच्या डोक्यात कोयत्याने वार करून खून केला.

Murder
Manjarwadi Dangerous Turn Accident: नारायणगाव–मांजरवाडी रस्त्यावरील धोकादायक वळण अपघातांना निमंत्रण

त्यानंतर प्रशांत पळून गेला. रविवारी (दि. 14) खुनाची घटना उघडकीस आली. आरोपी प्रशांतला पकडण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली होती. सोमवारी (दि. 15) आरोपी यवत परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

Murder
Rajgad Kadve Cliff Rescue: राजगड तालुक्यातील कादवे गावात तरुण कड्यावर अडकला; रात्रभरानंतर सुखरूप बचाव

त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे, उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी, महेश पाटील, हवालदार अण्णा देशमुख, तात्यासाहेब खाडे, विठ्ठल कदम, दशरथ बनसोडे, संदीप भापकर, हेमंत भोंगळे, योगेश चितारे, प्रसाद कोळेकर यांच्या पथकाने यवत परिसरातील शेतात सुशांतला अटक केली. त्याने खुनाची कबुली दिली आहे. तसेच त्याच्या अल्पवयीन साथीदारास ताब्यात घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news