आकुर्डी : बाप्पाच्या विसर्जनासाठी जाधव घाट सज्ज

आकुर्डी : बाप्पाच्या विसर्जनासाठी जाधव घाट सज्ज
Published on
Updated on

आकुर्डी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : वाल्हेकरवाडी येथील जाधव घाट व भोंडवे वस्ती येथील घाट महापालिकेतर्फे स्वच्छ करण्यात आले आहे. लाडक्या बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर तीन, सात, नऊ व शेवटच्या दिवशी म्हणजे दहा दिवसांनी बाप्पाला निरोप देण्यासाठी स्वयंसेवी संस्था व महापालिकेतर्फे तयारी सुरू झाली आहे. गणेश विसर्जनासाठी शहरातील 32 ठिकाणी महापालिकेतर्फे व्यवस्था करण्यात आली आहे. त्यापैकी वाल्हेकरवाडी येथील पवना नदीवरील जाधव घाट तसेच रावेत येथील भोंडवे घाटाची स्वच्छता करण्यात आली आहे.

विसर्जनासाठी हौदाची व्यवस्था

नदीमध्ये प्रदूषण होऊ नये, याकरिता महापालिकेतर्फे हौदाची व्यवस्था करण्यात आली आहे. स्वयंसेवी संस्थामार्फत मूर्ती संकलनदेखील केले जात आहे. यासाठी भाविकांना गणेशमूर्तीचे हौदात विसर्जन करण्याचे आवाहन केले जात आहे.

विसर्जन घाटांवर रेस्क्यू टीम सज्ज

गणपती विसर्जनावेळी अप्रिय घटना घडू नये, याकरिता महापालिका कर्मचारी, जीवरक्षक तसेच अग्निशामक दल, आपत्ती व्यवस्थापन आणि सुरक्षा रक्षक दल तैनात करण्यात आले आहेत. यासोबतच सुसज्ज रुग्णवाहिकाही तैयार ठेवल्या आहेत. यासोबतच भाविकांना मार्गदर्शन करण्यासाठी मंडपाची सुविधाही केली आहे. अग्निशामक विभागाच्या वतीने विसर्जन घाटांवर लाईफ जॅकेट, रिंग, गळ, बोट, मेगा फोन, दोरी अशा रेस्क्यू साहित्यासह अग्निशामक पथक तैनात करण्यात आले आहेत.

निर्माल्य कुंडाची व्यवस्था

वाल्हेकरवाडी येथील जाधव घाटावर निर्माल्य कुंडाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये पूजेचे साहित्य, हार, फुले, नारळ करवंट्या, ओला व सुका निर्माल्य टाकण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात प्लास्टिक मिक्स होणार नाही, याची काळजी स्वयंसेवकांनी घेतली आहे. तसेच घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनाचे प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news